तुम्हाला WhatsApp शी कनेक्ट करता येत नसेल, तर ते तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये किंवा तुमच्या इंटरनेट कनेक्शनमध्ये असलेल्या समस्यांमुळे असू शकते. WhatsApp हटवून पुन्हा इंस्टॉल करणे आवश्यक असू शकते.
समस्यांचे निराकरण
खालील उपाय केल्याने अनेक समस्या सोडवता येऊ शकतात :
- तुम्ही तुमचा फोन बंद करून पुन्हा सुरु करून बघा.
- खात्री करून घ्या की तुम्ही App Store येथून WhatsApp ची नवीन सुधारित आवृत्ती वापरत आहात.
- iPhone चालू करा आणि Settings
आणि Airplane Mode चालू आणि बंद करा. - iPhone चालू करा आणि Settings
> Cellular वर टॅप करा आणि Cellular Data चालू वर सेट करा. - iPhone चालू करा आणि Settings
> Wi-Fi वर टॅप करा > आणि Wi-Fi बंद करून परत चालू करा. - दुसऱ्या वाय-फाय हॉटस्पॉट ला कनेक्ट करून बघा.
- खात्री करून घ्या की स्लीप मोड अर्थात निष्क्रीयता मोड वर असताना वाय-फाय चालू आहे.
- वाय-फाय राऊटर बंद करून परत चालू करा.
- तुमच्या मोबाइल प्रदात्याशी संपर्क साधा आणि तुमच्या APN सेटिंग्ज योग्यप्रकारे सेट केल्या आहे ते तपासून घ्या.
- iPhone उघडा Settings
> General > Reset> Reset Network Settings > Reset Network Settings वर टॅप करा. (हे तुमचे सेव्ह केलेले सर्व वाय-फाय पासवर्ड हटवेल). - तुमची iPhone वरील ऑपरेटिंग सिस्टीम तुमच्या फोनच्या नवीन आवृत्तीसाठी अपग्रेड करा किंवा रिस्टोअर करा.
- तुम्ही जर अनलॉक केलेला iPhone वापरत असाल किंवा प्री-पेड सिमकार्ड वापरत असाल तर तुम्ही तुमच्या फोनचे APN सेटिंग्ज योग्यप्रकारे सेट करणे गरजेचे आहे. अधिक माहिती आणि सूचनांसाठी तुमच्या मोबाईल सर्व्हिस कॅरिअर बरोबर संपर्क साधा.
- जर तुम्ही नेहमी न वापरणारे वाय-फाय वापरत असाल आणि त्यामुळे WhatsApp शी कनेक्ट होताना समस्या येत असेल तर तुमच्या नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधा.
- तुमचे कनेक्शन तुमच्या ऑफिस किंवा युनिव्हर्सिटी कॅम्पस सारख्या व्यवस्थापित केलेल्या वाय-फाय नेटवर्कवर नसल्याची खात्री करा. तुमचे नेटवर्क ब्लॉक करण्यासाठी किंवा कनेक्शन मर्यादित करण्यासाठी कॉन्फिगर केले जाऊ शकते.
- WhatsApp हे VPN किंवा प्रॉक्सी सर्व्हिसेस वर चालण्यासाठी तयार केलेले नाही त्यामुळे त्या कॉन्फिगरेशन्सला आम्ही सपोर्ट करू शकणार नाही.
- रोमिंग बंद करा.
WhatsApp संदेशांच्या अधिसूचनांबद्दल समस्या असतील तर हा लेख वाचा.