तुमच्या चॅट मध्ये आलेल्या काही लिंक्स वर तुम्हाला 'संशयास्पद लिंक' असे चिन्हांकित केलेले दिसेल.
हे चिन्ह तेव्हा दिसते जेव्हा आलेल्या लिंक मध्ये अशी काही कॅरेक्टर्स असतात जी सर्वसाधारणपणे वापरली जात नाहीत. असे कॅरेक्टर्स वापरून स्पॅमर्स तुम्हाला फसविण्यासाठी ती लिंक अशी बनवितात की ती एखादी वैध साईट वाटावी, परंतु मुळात मात्र ती तुम्हाला एखाद्या फसव्या साईटवर घेऊन जाते.
संशयास्पद लिंकचे उदाहरण पहा :
https://ẉhatsapp.com/free-tickets
टीप : पहिले कॅरेक्टर "w" असे वाटत आहे परंतु ते "ẉ" असे आहे, याचा अर्थ स्पॅमर्स तुम्हाला अशा वेबसाईट वर घेऊन जात आहेत ज्याचा आणि WhatsApp चा काहीच संबंध नाही.
तुमच्याकडे जेव्हा एखादी लिंक येते तेव्हा त्या संदेशामधील मजकूर काळजीपूर्वक वाचा. जर लिंक संशयास्पद म्हणून चिन्हांकित झाली असेल तर तुम्ही त्यावर टॅप केल्यावर एक पॉप अप संदेश दिसेल ज्यामध्ये त्या लिंक मध्ये कोणती असामान्य कॅरेक्टर्स आहेत ते दाखविले जाईल त्यानंतर ती लिंक उघडायची की चॅट मध्ये परत जायचे हे तुम्ही ठरवू शकता.
लिंक संशयास्पद आहे का हे ठरविण्यासाठी WhatsApp ऑटोमॅटिक तपासणी करते. गोपनीयता जपण्यासाठी ही तपासणी पूर्णपणे तुमच्या डिव्हाइसवर केली जाते आणि एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन, असल्यामुळे WhatsApp ला तुमच्या संदेशामधूल मधील मजकूर दिसू शकत नाही.
WhatsApp वर सुरक्षित कसे राहावे याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी कृपया हा लेख वाचा.