iOS 9 किंवा त्याहून नवीन आवृत्त्यांवर WhatsApp मधील अतिरिक्त सुरक्षेसाठी 'टच आयडी' किंवा 'फेस आयडी' हे फीचर सुरू करता येते. हे फीचर सुरू केल्यावर तुम्हाला WhatsApp अनलॉक करण्यासाठी 'टच आयडी' किंवा 'फेस आयडी' वापरावा लागतो. असे असले तरी, तुम्ही WhatsApp लॉक असतानाही कॉल्सना उत्तर देऊ शकता किंवा नोटिफिकेशन्समधून मेसेजेसना उत्तर देऊ शकता.
WhatsApp वर 'टच आयडी' किंवा 'फेस आयडी' वापरण्यासाठी तुम्ही तो सर्वप्रथम iPhone सेटिंग्ज मधून सुरू करणे आवश्यक आहे.
टीप: 'टच आयडी' किंवा 'फेस आयडी' ने WhatsApp अनलॉक झाले नाही तर, तुम्ही तुमचा iPhone पासवर्ड वापरून WhatApp उघडू शकता.