कॅटलॉग किंवा बिझनेसची तक्रार कशी नोंदवावी
एखादा बिझनेस आमच्या कॉमर्स पॉलिसीचे उल्लंघन करतो आहे असे वाटत असेल, तर तुम्ही त्या बिझनेसची तक्रार करू शकता.
प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची तक्रार नोंदवण्यासाठी:
- बिझनेससोबतचे चॅट उघडा.
- WhatsApp Business प्रोफाइल पाहण्यासाठी त्यांच्या बिझनेस नावावर टॅप करा.
- कॅटलॉग च्या बाजूला असलेल्या ‘सर्व पहा’ वर टॅप करा.
- तपशील पाहण्यासाठी प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस वर टॅप करा.
- अधिक
> तक्रार करा वर टॅप करा. - तुमच्याकडे दोन पर्याय असतील:
- प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची तक्रार नोंदवण्यासाठी, तक्रार नोंदवा वर टॅप करा.
- आणखी तपशील देण्यासाठी, आम्हाला आणखी सांगा वर टॅप करा. नंतर, पर्याय निवडा आणि सबमिट करा वर टॅप करा.
बिझनेसची तक्रार नोंदवण्यासाठी:
- WhatsApp Business प्रोफाइल वर जा.
- बिझनेसची तक्रार नोंदवा वर टॅप करा.
- तुमच्याकडे दोन पर्याय असतील:
- बिझनेस ब्लॉक करून त्याची तक्रार नोंदवण्यासाठी तक्रार करून ब्लॉक करा वर टॅप करा.
- बिझनेसची तक्रार नोंदवण्यासाठी, तक्रार नोंदवा वर टॅप करा.