तुम्ही पाठवत असलेल्या प्रत्येक संदेशासमोर बरोबरच्या खुणा दिसतील. त्या पुढीलप्रमाणे कार्य करतील :
हे दर्शवेल की तुमचा संदेश यशस्वीरीत्या पाठवला गेला आहे.
हे दर्शवेल की तुम्ही ज्यांना संदेश पाठवत होता त्यांच्याकडे यशस्वीरीत्या संदेश पोहोचला आहे.
हे दर्शवेल की तुम्ही ज्यांना संदेश पाठवत होता त्यांनी तुमचा संदेश वाचला आहे.
ग्रुप चॅटमध्ये जेव्हा सर्व सदस्यांकडे संदेश पोहोचेल तेव्हा दोन बरोबरच्या खुणा दिसतील. दोन निळ्या बरोबरच्या खुणांचा अर्थ हा असेल की तो संदेश सर्व ग्रुप सदस्यांनी वाचला आहे.
संदेश माहिती
तुम्ही कोणताही संदेश पाठविता तेव्हा तुम्ही तुम्हाला संदेश माहिती स्क्रीन दिसते ज्यात तुमचा संदेश कधी पोचला, वाचला किंवा प्राप्तकर्त्यांद्वारे प्ले केला गेला ही माहिती असते.
संदेश माहिती स्क्रीन बघण्यासाठी :
वैयक्तिक आणि ग्रुप चॅट उघडा.
संदेशावर उजवीकडून डावीकडे स्वाईप करा.
तुम्ही असेही करू शकता, तुम्ही पाठविलेल्या संदेशावर टॅप करून धरून ठेवा आणि मेनू मधून माहिती निवडा.
संदेश माहिती स्क्रीन दाखवते :
पोहोचला :
जेव्हा तुमचा संदेश प्राप्तकर्त्यांपर्यंत पोहोचतो परंतु त्यांनी पाहिलेला नसतो.
वाचला किंवा पाहिला :
जेव्हा प्राप्तकर्त्याने तुमचा संदेश वाचलेला अथवा फोटो, ऑडिओ फाइल किंवा व्हिडिओ किंवा बघितलेला असतो.
प्राप्तकर्त्याने तुमचा व्हॉइस मेसेज पाहिलेला असतो परंतु चालू करून ऐकलेला नसतो.
प्ले केला :
प्राप्तकर्त्याने तुमचा व्हॉइस मेसेज चालू करून ऐकलेला असतो.
टीप : लक्षात घ्या की जेव्हा सहभागी सदस्य ग्रुप सोडतो तेव्हा संदेश माहिती स्क्रीन अजूनही ज्या सदस्याने ग्रुप सोडला आहे त्याच्या माहितीसह पूर्वीची सर्व माहिती दाखवते.
वाचल्याची पोचपावती मिळत नसणे
तुम्हाला तुमच्या पाठवलेल्या संदेशाच्या बाजूच्या दोन बरोबरच्या निळ्या खुणा दिसत नसतील तर :
तुम्ही किंवा प्राप्तकर्त्याने पोचपावत्या त्याच्या गोपनीयता सेटिंग्ज मध्ये डिसेबल अर्थात अक्षम केले असण्याची शक्यता आहे.
प्राप्तकर्त्याने तुम्हाला ब्लॉक केले असेल.
प्राप्तकर्त्याचा फोन कदाचित बंद असेल.
प्राप्तकर्त्याने कदाचित तुमचे संभाषण अजून उघडले नसेल.
तुम्ही किंवा प्राप्तकर्ता यांच्यामध्ये कनेक्शन मध्ये अडथळा असेल.
पोचपावत्या बंद ठेवा
पोचपावती फीचर मधून बाहेर येण्यासाठी सेटिंग्ज > खाते > गोपनीयता येथे जा आणि पोचपावती बंद करा.
टीप : यामुळे ग्रुप चॅट किंवा व्हॉइस मेसेजेसची पोचपावती अक्षम होणार नाही. हे सेटिंग बंद करण्याचा कोणताही मार्ग नाही.