तुम्हाला काही विशिष्ट संपर्कांकडून मेसेजेस, कॉल्स आलेले नको असतील किंवा त्यांची स्टेटस अपडेट्स दिसायला नको असतील, तर तुम्ही त्यांना ब्लॉक करू शकता.
संपर्कास ब्लॉक करण्यासाठी :
- WhatsApp उघडा. सेटिंग्ज > खाते > गोपनीयता > ब्लॉक केलेले > नवीन जोडा.. येथे जा.
- तुम्हाला ज्याला ब्लॉक करायचे आहे तो संपर्क शोधा किंवा निवडा.
संपर्कास ब्लॉक करण्याचे आणखी काही मार्ग खालीलप्रमाणे :
- अनोळखी फोन नंबरसोबत झालेले चॅट उघडा. त्यानंतर, संपर्क नाव > > ब्लॉक केलेले संपर्क > ब्लॉक करा किंवासंपर्कांची तक्रार करा > तक्रार करा किंवा ब्लॉक करा वर टॅप करा.
- तुमच्या चॅट टॅबवर जाऊन त्या संपर्कासोबत झालेल्या चॅटवर डावीकडे स्वाइप करा. त्यानंतर, अधिक > संपर्क माहिती > संपर्क ब्लॉक करा > ब्लॉक करा वर टॅप करा. तुम्ही संपर्काची तक्रार नोंदवा > तक्रार करा व ब्लॉक करा वरही टॅप करू शकता. हे केल्याने त्या फोन नंबरबद्दल तक्रार नोंदवली जाईल व तो संपर्क ब्लॉक होईल.
अनोळखी फोन नंबरला ब्लॉक करणे
अनोळखी फोन नंबरला ब्लॉक करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत :
- तुम्हाला या फोन नंबरवरून पहिल्यांदाच मेसेज आला असेल, तर ते चॅट उघडून ब्लॉक करा > ब्लॉक करा वर टॅप करा.
- अनोळखी फोन नंबरसोबत झालेले चॅट उघडा. त्यानंतर, संपर्क नाव > संपर्क ब्लॉक करा > ब्लॉक करा किंवा तक्रार करा व ब्लॉक करा वर टॅप करा.
टीप :
- ब्लॉक केलेल्या संपर्काने पाठवलेले मेसेजेस, कॉल्स आणि स्टेटस अपडेट्स तुम्हाला मिळणार नाहीत आणि तुमच्या फोनवर दिसणार नाहीत.
- ब्लॉक केलेल्या संपर्कांना तुमचे ‘अखेरचे पाहिले’, ‘ऑनलाइन आहे’, स्टेटस अपडेट्स किंवा तुमच्या प्रोफाइल फोटोमधील बदल दिसणार नाहीत.
- एखाद्या संपर्कास ब्लॉक केल्याने तो तुमच्या संपर्क यादीतून काढला जाणार नाही, तसेच त्या संपर्काच्या फोनमधून तुमचा नंबर काढून टाकला जाणार नाही. एखादा संपर्क हटवण्यासाठी, तुम्ही तो तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुकमधून हटवणे आवश्यक आहे.
- तुम्ही एखाद्या संपर्कास ब्लॉक करत आहात हे त्या संपर्कास कळेल का, याबद्दल शंका वाटत असल्यास, कृपया हा लेख पहा.
संपर्कास अनब्लॉक करण्यासाठी :
- सेटिंग्ज > खाते > गोपनीयता> ब्लॉक केलेले वर टॅप करा.
- संपर्काच्या नावावर डावीकडे स्वाइप करा.
- किंवा, संपादित करा वर टॅप करून लाल रंगाच्या वजा चिन्हावर टॅप करा.
- अनब्लॉक करा वर टॅप करा.
संपर्कास अनब्लॉक करण्याचे आणखी काही मार्ग :
- संपर्कासोबत झालेले चॅट उघडा. त्यानंतर संपर्काच्या नावावर टॅप करून संपर्क अनब्लॉक करा वर टॅप करा.
- तुमच्या चॅट टॅबवर जाऊन त्या संपर्कासोबत झालेल्या चॅटवर डावीकडे स्वाइप करा. त्यानंतर, अधिक > संपर्क माहिती > संपर्क अनब्लॉक करा वर टॅप करा.
टीप : तुम्ही ब्लॉक केलेल्या एखाद्या संपर्कास अनब्लॉक केले तरी, तो संपर्क ब्लॉक असताना त्याने पाठवलेले मेसेजेस, कॉल्स किंवा स्टेटस अपडेट्स तुम्हाला मिळणार नाही.
संबंधित लेख :
संपर्क ब्लॉक आणि अनब्लॉक करणे : Android | KaiOS