गोपनीयता सेटिंग्ज सेट करणे
मूलभूतरीत्या WhatsApp तुमचे गोपनीयता सेटिंग खालील गोष्टींना अनुमती देते :
- कोणत्याही WhatsApp वापरकर्त्याला तुमच्या पोचपावत्या, अखेरचे पाहिलेले, माझ्याबद्दल आणि प्रोफाइल फोटो हे पाहण्याची अनुमती मिळते.
- तुमचे संपर्क तुमचे 'स्टेटस' अपडेट्स बघू शकतात.
हे सेटिंग बदलण्यासाठी WhatsApp > सेटिंग्ज > खाते > गोपनीयता येथे जा.
टीप :
- जर तुम्ही तुमचे अखेरचे पाहिलेले शेअर केले नसेल तर तुम्ही देखील दुसऱ्याचे अखेरचे पाहिलेले पाहू शकणार नाही.
- तुम्ही ऑनलाईन आहात किंवा लिहीत आहे हे गुप्त ठेवण्याचा कोणताही मार्ग नाही.
- तुम्ही जर पोचपावत्या बंद केल्या तर तुम्ही इतरांच्या पोचपावत्या देखील बघू शकणार नाही. ग्रुप चॅट साठी नेहमीच पोचपावत्या पाठविल्या जातात.
- जर एखाद्या संपर्काने तुमच्या पोचपावत्या अक्षम केल्या असतील, तर त्यांनी तुमचे स्टेटस अपडेट बघितले आहे की नाही हे तुम्ही पाहू शकणार नाही.
पुढील प्लॅटफॉर्म्सवर गोपनीयता सेटिंग्जबद्दल अधिक जाणून घ्या : Android