तुमच्या iPhone मधील फोटो आणि व्हिडिओ WhatsApp वर वापरण्यासाठी तुम्ही या ॲपला तशी परवानगी देणे आवश्यक आहे. तुम्ही फोटो वापरण्याची परवानगी दिली नाही, तर तुम्हाला हा अलर्ट दिसेल:
तुम्ही iPhone च्या गोपनीयता सेटिंग्जमध्ये जाऊन परवानगी बदलू शकता.
WhatsApp उघडा. आता तुम्हाला तुमच्या iPhone वरील फोटो WhatsApp वर वापरता येणे शक्य होईल.
तुम्ही तुमच्या iPhone वर Settings > Screen Time येथे काही मर्यादा सेट केलेल्या नाहीत याची खात्री करून घ्या. नाहीतर, तुम्हाला तुमच्या फोनचा बॅकअप घ्यावा लागेल आणि तो रिस्टोअर करावा लागेल.