मला माझी WhatsApp साठी असलेली रिंगटोन कशी बदलता येईल?
iPhone वर, WhatsApp मध्ये असलेल्या रिंगटोनव्यतिरिक्त दुसरी रिंगटोन निवडण्याचा कोणताही मार्ग नाही. जेव्हा ॲप बंद असते त्यासाठीचा रिंगटोन तुम्हाला WhatsApp सेटिंग्ज > नोटिफिकेशन्स मधून बदलता येईल. येथे तुम्ही मेसेजेस, ग्रुप मेसेजेस आणि WhatsApp कॉल्ससाठी वेगवेगळ्या रिंगटोन्स निवडू शकता.
iOS 10, iOS 11 आणि iOS 12 आणि तृतीयपक्ष कॉल इंटिग्रेशनमध्ये, फोनच्या Contacts ॲपमध्ये सेट केलेली रिंगटोन WhatsApp च्या व्हॉइस कॉलसाठीही वापरली जाते.
iOS 10, iOS 11 आणि iOS 12 वर WhatsApp व्हॉइस कॉल्सकरिता कस्टम रिंगटोन सेट करण्यासाठी:
- तुमच्या iPhone च्या Contacts ॲपमध्ये जा.
- तुम्हाला ज्या संपर्कासाठी कस्टम रिंगटोन ठेवायची आहे तो संपर्क निवडा.
- स्क्रीनच्या वरील बाजूस उजवीकडे असणाऱ्या Edit बटणावर टॅप करा.
- रिंगटोन निवडा.
- तुमचा iPhone बंद करून परत सुरू करा.
टीप:
- मेसेजेससाठी येणाऱ्या नोटिफिकेशनचे आवाज WhatsApp सेटिंग्ज > नोटिफिकेशन्स येथे सेट करता येतील.
- ग्रुप कॉल्ससाठी डिफॉल्ट रिंगटोन वापरली जाते. ही रिंगटोन कस्टमाइझ करता येत नाही.
महत्त्वाचे: iOS 10 मधील बगमुळे, तुम्ही जोपर्यंत तुमचा फोन परत सुरू करत नाही, तोपर्यंत नोटिफिकेशनचा आवाज योग्यप्रकारे काम करणार नाही (त्यासाठी पॉवर आणि होम बटण 10 सेकंद दाबून धरा).