सपोर्ट असलेली डिव्हाइसेस
आम्ही iOS 12 आणि त्यापुढील आवृत्त्यांना सपोर्ट करतो, पण तुम्ही उपलब्ध असलेली नवीनतम आवृत्ती वापरावी असे आम्ही सुचवतो.
आम्ही कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम्सना सपोर्ट करावा हे कसे निवडतो आणि तुमच्या सिस्टीमला यापुढे सपोर्ट करणे थांबवल्यास काय होईल याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी हा लेख वाचा.
iOS वर WhatsApp वापरताना उत्तम अनुभव यावा यासाठी:
- नवीनतम iOS आवृत्ती वापरा: तुम्ही तुमच्या फोनसाठी उपलब्ध असलेली नवीनतम iOS आवृत्ती वापरावी असे आम्ही सुचवतो. तुमच्या iPhone चे सॉफ्टवेअर कसे अपडेट करावे हे जाणून घेण्यासाठी कृपया Apple सपोर्ट वेबसाइटला भेट द्या.
- जेलब्रोकन किंवा अनलॉक्ड डिव्हाइसेस वापरू नका: आम्ही जेलब्रोकन किंवा अनलॉक्ड डिव्हाइसेसवर उघडपणे मर्यादा घालत नाही. पण, अशा बदलांनी तुमच्या डिव्हाइसच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने आम्ही iPhone च्या ऑपरेटिंग सिस्टीमची मॉडिफाय केलेली आवृत्ती वापरणाऱ्या डिव्हाइसेसना सपोर्ट देऊ शकत नाही.
- तुमच्या फोनवर कॉल किंवा एसएमएस मिळवता येणे आवश्यक आहे: नवीन WhatsApp खाते व्यवस्थितपणे सेट करण्यासाठी, पडताळणी प्रक्रिया सुरू असताना तुम्हाला तुमच्या फोनवर कॉल किंवा एसएमएस मिळवता येणे आवश्यक आहे. फक्त वायफाय वापरणाऱ्या डिव्हाइसवर नवीन खाती सेट करण्याला आम्ही सपोर्ट करत नाही.
आम्ही आमच्या सिस्टीम्समध्ये नवनवीन तंत्रज्ञानांचा अंगीकार करतो आणि ते करताना आम्ही आपसूकच जुन्या ऑपरेटिंग सिस्टीम्सना सपोर्ट करणे थांबवतो.
आम्ही तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमला सपोर्ट करणे थांबवल्यास, WhatsApp वापरणे पुढे सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला तुमचे डिव्हाइस अपग्रेड करण्याविषयी सूचित केले जाईल आणि काही वेळा आठवण करून दिली जाईल. आम्ही सपोर्ट करत असलेली नवीनतम iOS आवृत्ती सूचीबद्ध केलेली आहे याची खात्री करण्यासाठी आम्ही हे पेज नियमितपणे अपडेट करू.