संपर्क न दिसणे
संपर्कांबाबतच्या सर्वोत्तम अनुभवासाठी तुम्ही WhatsApp ला तुमचे संपर्क वापरण्याची परवानगी द्यावी असे आम्ही सुचवतो.
तुमचे संपर्क वापरता न येणे
iPhone Settings > Privacy येथे जा.- Contacts वर टॅप करा.
- WhatsApp ‘सुरू आहे’ वर सेट आहे याची खात्री करून घ्या.
WhatsApp करड्या रंगात दिसत असेल, किंवा गोपनीयता सेटिंग्जमध्ये दिसतच नसेल, तर तुम्ही
तुम्ही WhatsApp ला तुमच्या फोनमधील संपर्क वापरण्याची परवानगी दिलेली नसेल, तरीही तुम्ही हे करू शकता :
- इतर WhatsApp वापरकर्ते आणि ग्रुप्सचे मेसेज मिळवू शकता.
- WhatsApp सेटिंग्ज बदलू शकता.
तुम्ही हे करू शकणार नाही :
- तुम्हाला संपर्काचे नाव दिसणार नाही, फक्त त्याचा फोन नंबरच दिसेल.
- नवीन ग्रुप्स किंवा ब्रॉडकास्ट लिस्ट सुरू करता येणार नाही.
काही संपर्क न दिसणे
तुम्हाला तुमचे काही WhatsApp संपर्क दिसत नसतील, तर पुढील गोष्टी करून पहा:
आंतरराष्ट्रीय संपर्कांसाठी :
- तुम्ही फोन नंबर संपूर्ण आंतरराष्ट्रीय फॉरमॅट मध्ये सेव्ह केला आहे याची खात्री करून घ्या.
तुम्ही iOS ची आवृत्ती 11.3 किंवा त्यापुढील आवृत्ती वापरत असाल आणि तुम्हाला दिसत नसलेले संपर्क हे Exchange खात्यामध्ये स्टोअर केलेले असतील, तर खाते ॲडमिनिस्ट्रेटर WhatsApp किंवा इतर ॲप्सना तुमचे संपर्क वापरण्याची परवानगी देत नाही आहे, असे होऊ शकते. तुम्ही ही समस्या खालील प्रकारे सोडवू शकता :
- तुमचे Exchange संपर्क तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुकमध्ये किंवा iCloud वर कॉपी करा.
- तुमच्या आयटी ॲडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधून WhatsApp ला iPhone मधील एक व्यवस्थापित ॲप करून घ्या.
टीप :
- Exchange खाती ही शक्यतो कामाशी निगडीत खाती असतात.