स्टिकर्स फीचर कसे वापरावे
स्टिकर्स डाउनलोड करण्यासाठी आणि वापरण्यासाठी:
- वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
- स्टिकर पॅक जोडण्यासाठी, स्टिकर्स
> जोडा वर टॅप करा. - तुम्हाला डाउनलोड करायच्या असलेल्या स्टिकर पॅकसमोरील डाउनलोड
वर टॅप करा. सूचना दिसल्यास, डाउनलोड • {फाइल साइझ} वर टॅप करा.- डाउनलोड पूर्ण झाल्यावर बरोबरची खूण
दिसेल.
- डाउनलोड पूर्ण झाल्यावर बरोबरची खूण
- स्टिकर्स पॉपअपवर खालच्या दिशेने स्वाइप करा.
- तुम्हाला जे स्टिकर पाठवायचे आहे ते शोधा व त्यावर टॅप करा.
एकदा तुम्ही स्टिकर वर टॅप केले की, ते आपोआप पाठवले जाते.
अधिक पर्याय:
- तुम्ही अलीकडे वापरलेली स्टिकर्स पाहण्यासाठी अलीकडील
वर टॅप करा - तुमच्या आवडीची स्टिकर्स पाहण्यासाठी आवडीचे
वर टॅप करा.- स्टिकर आवडीचे करण्यासाठी तुमच्या वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटमधील स्टिकरवर हलकेच टॅप करा आणि आवडीचे मध्ये जोडा वर टॅप करा. किंवा, स्टिकर्स
वर टॅप करा. स्टिकरवर टॅप करून होल्ड करा, त्यानंतर आवडीचे मध्ये जोडा वर टॅप करा. - स्टिकर आवडीचे मधून हटवण्यासाठी तुमच्या वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटमधील स्टिकरवर हलकेच टॅप करा > आवडीचे मधून काढा वर टॅप करा. किंवा, स्टिकर्स
> आवडीचे वर टॅप करा. स्टिकरवर टॅप करून होल्ड करा, त्यानंतर आवडीचे मधून काढा वर टॅप करा.
- स्टिकर आवडीचे करण्यासाठी तुमच्या वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटमधील स्टिकरवर हलकेच टॅप करा आणि आवडीचे मध्ये जोडा वर टॅप करा. किंवा, स्टिकर्स
- तुम्ही डाउनलोड केलेले विशिष्ट स्टिकर शोधण्यासाठी शोधा
वर टॅप करा. तुम्ही मजकूर किंवा इमोजी वापरून स्टिकर्स शोधू शकता. - टीप: जर स्टिकर निर्मात्याने WhatsApp च्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे स्टिकर्सना टॅग केले नसेल तर तुम्ही WhatsApp च्या बाहेर डाउनलोड केलेली स्टिकर्स शोधू शकणार नाही.
- स्टिकरचा शोध पूर्णपणे ऑफलाइन चालतो. WhatsApp तुमच्या स्टिकर शोधाच्या वापराची किंवा तुम्ही स्टिकर्स शोधताना वापरलेल्या कीवर्ड्सची माहिती गोळा करत नाही.
- चिन्हांवर दाखवलेल्या इमोजीच्या आधारे स्टिकर्सची वर्गवारी केली जाते. स्टिकर कॅटेगरीचा संच पाहण्यासाठी हार्ट बॉक्स
वर टॅप करा. - तुम्ही डाउनलोड केलेली स्टिकर पॅक्स पाहण्यासाठी, जोडा
> माझी स्टिकर्स यावर टॅप करा.- तुम्हाला एखादे स्टिकर पॅक हटवायचा असेल तर हटवा > हटवा वर टॅप करा.
- तुमच्या स्टिकर पॅक्सची क्रमवारी बदलायची असल्यास संपादित करा वर टॅप करा. त्यानंतर, स्टिकर पॅकच्या शेजारी असलेल्या पुन्हा क्रमाने लावा
चिन्हावर टॅप करून होल्ड करा आणि ते वर किंवा खाली ड्रॅग करा.
- स्टिकर पॅक्स अपडेट करण्यासाठी, निळा बिंदू दिसेल तेव्हा जोडा
वर टॅप करा. सर्व स्टिकर्स या टॅबअंतर्गत जी स्टिकर्स पॅक्स अपडेट करायची आहेत त्यांच्यासमोरील अपडेट करा वर टॅप करा. अपडेट करा • {फाइल साइझ} असे दिसले तर त्यावर टॅप करा.- अपडेट पूर्ण झाल्यावर हिरवी बरोबरची खूण
दिसेल.
- अपडेट पूर्ण झाल्यावर हिरवी बरोबरची खूण
'स्टिकर्स' हे फीचर हे WhatsApp च्या नवीन आवृत्तीवर उपलब्ध आहे. तुम्हाला स्टिकर्स न आढळल्यास, कृपया WhatsApp अपडेट करून नवीनतम आवृत्ती वापरा.