WhatsApp वर शोध कसा घ्यावा
WhatsApp च्या 'शोध' फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरील विशिष्ट मेसेजेस, फोटो, व्हिडिओ, लिंक्स, GIFs, ऑडिओ आणि डॉक्युमेंट्स शोधू शकता.
कीवर्ड्सच्या मदतीने चॅट शोधणे
'शोध' फीचरमुळे तुम्हाला एखाद्या कीवर्डच्या मदतीने तुमच्या चॅटमध्ये शोध घेता येतो.
- WhatsApp उघडा.
- शोध बार दिसावा यासाठी चॅट टॅबवरून खालच्या दिशेने स्वाइप करा.
- शोध फिल्डमध्ये तुम्हाला जो शब्द शोधायचा आहे तो लिहा.
- त्यानंतर शोध परिणामांमध्ये दिसणारा एखादा मेसेज हा चॅट विंडोमध्ये उघडण्यासाठी त्या शोध परिणामावर टॅप करा.
मीडिया शोधण्यासाठी फिल्टर्सचा वापर करणे
तुम्ही 'शोध' फीचरमध्ये फिल्टर्सचा वापर करून तुमच्या चॅटमधील फोटो, व्हिडिओ, लिंक्स, GIFs, ऑडिओ अशा मीडिया फाइल्स आणि डॉक्युमेंट्सचा शोध घेऊ शकता.
- WhatsApp उघडा.
- शोध बार दिसावा यासाठी चॅट टॅबवरून खालच्या दिशेने स्वाइप करा.
- ज्या शब्दाचा शोध घ्यायचा आहे तो शब्द शोध बारमध्ये लिहा.
- तुम्हाला जो मीडिया प्रकार शोधायचा आहे तो मीडिया प्रकार ड्रॉपडाउन मेनूमधून निवडा.
- ती मीडिया फाइल चॅटमध्ये उघडण्यासाठी त्या शोध परिणामावर टॅप करा.
मीडिया पाहणे
तुम्ही सर्व फोटो, व्हिडिओ, लिंक्स, GIFs, ऑडिओ किंवा डॉक्युमेंट्स पाहू शकता.
- WhatsApp उघडा.
- शोध बार दिसावा यासाठी चॅट टॅबवरून खालच्या दिशेने स्वाइप करा.
- फोटो, व्हिडिओ, लिंक्स, GIFs, ऑडिओ किंवा डॉक्युमेंट्स असा वर्गवारीनिहाय मीडिया पाहण्यासाठी त्या वर्गवारीवर टॅप करा.