ग्रुपमधून बाहेर पडणे आणि ग्रुप हटवणे
तुम्ही ग्रुप ॲडमिन असाल, तर तुम्ही सर्व सदस्यांसाठी ग्रुप हटवू शकता. ग्रुप हटवण्यापूर्वी आधी सर्व सदस्यांना काढून नंतर तुम्ही ग्रुपमधून बाहेर पडणे आवश्यक आहे.
तुम्ही ग्रुप हटवता, तेव्हा तुम्हाला चॅट लिस्टमध्ये तो ग्रुप दिसणार नाही आणि तुमचे पूर्वीचे चॅट तुमच्या फोनमधून हटवले जाईल, इतर सदस्य त्यानंतरही त्यांच्या चॅट लिस्टमध्ये तो ग्रुप पाहू शकतील. परंतु, कोणीही त्या ग्रुपला मेसेजेस पाठवू शकणार नाही.
ग्रुपच्या सदस्यांना काढणे
- WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
- सदस्याच्या नावावर टॅप करा > ग्रुपमधून काढा > काढा.
ग्रुपमधून बाहेर पडणे
सर्व सदस्यांना काढल्यानंतर तुम्हाला ग्रुप सोडावा लागेल.
- WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
- किंवा, चॅट टॅबवरील ग्रुपला डावीकडे स्वाइप करा. त्यानंतर, अधिक वर टॅप करा.
- ग्रुपमधून बाहेर पडा > ग्रुपमधून बाहेर पडा यावर टॅप करा.
ग्रुप हटवणे
तुम्ही ग्रुपमधून बाहेर पडल्यानंतर तुमच्याकडे ग्रुप हटवण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
- WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
- किंवा, चॅट टॅबवरील ग्रुपला डावीकडे स्वाइप करा. त्यानंतर, अधिक वर टॅप करा.
- ग्रुप हटवा > ग्रुप हटवा यावर टॅप करा.