तुम्ही संदेश फक्त तुमच्यासाठीच हटवू शकता किंवा ते संदेश सर्वांसाठी हटवण्याची विनंती करू शकता.
सर्वांसाठी संदेश हटविणे
सर्वांसाठी संदेश हटविणे ही सुविधा वापरून तुम्ही विशिष्ट संदेश एखाद्या वैयक्तिक चॅटमधून किंवा ग्रुप चॅटमधून हटवू शकता. तुम्ही जेव्हा एखादा संदेश चुकीच्या ग्रुपमध्ये पाठविता किंवा त्यामध्ये काही चूक झालेली असते अशावेळी या सुविधेचा उपयोग होतो. तुम्ही जेव्हा एखादा संदेश चुकीच्या चॅटमध्ये पाठवता किंवा त्यामध्ये काही चूक झालेली असते अशावेळी या सुविधेचा उपयोग होतो.
प्रत्येकासाठी यशस्वीरीत्या हटवलेले संदेश यासह बदलले जातील :
"हा संदेश हटवला होता"
सर्वांसाठी संदेश हटविण्यासाठी हे करा :
WhatsApp चालू करा आणि तुम्हाला जो संदेश हटवायचा आहे त्या चॅटमध्ये जा.
संदेशावर टॅप करून धरून ठेवा > मेनू मधून हटवा निवडा. तुम्ही एकावेळी अनेक संदेश सुद्धा निवडू शकता.
संदेशावर टॅप करून होल्ड करा >अधिक > हटवा निवडा.
हटवा > सर्वांसाठी हटवा वर टॅप करा.
टीप :
यशस्वीरीत्या सर्वांसाठी संदेश हटविण्यासाठी तुम्ही आणि तुमचे प्राप्तकर्ते हे WhatsApp ची नवीन आवृत्ती वापरत असणे गरजेचे आहे.
iOS साठी WhatsApp वापरणार्या प्राप्तकर्त्यांकडे तुम्ही पाठवलेले मीडिया तो संदेश WhatsApp चॅटमधून हटवलेला असतानाही त्यांच्या फोटोंमध्ये सेव्ह केलेले असू शकतात.
जर हटविणे यशस्वी झाले नाही तर किंवा हटविणे प्रक्रिया पूर्ण होण्याअगोदर प्राप्तकर्त्यांना तो संदेश दिसू शकतो.
सर्वांसाठी हटविणे यशस्वीपणे झाले की नाही याची तुम्हाला सूचना मिळणार नाही.
तुम्ही संदेश पाठवल्यानंतर तो सर्वांसाठी हटवला जाण्याची विनंती करण्यासाठी तुमच्याकडे साधारण एक तास असेल.
स्वतःसाठी संदेश हटविणे
तुम्ही तुमच्या फोनवरून पाठवलेल्या किंवा त्यावर मिळवलेल्या संदेशांची प्रत फक्त तुमच्या वैयक्तिक चॅट मधून हटवू शकता. याचा तुमच्या प्राप्तकर्त्याच्या चॅटवर परिणाम होत नाही. तुमच्या प्राप्तकर्त्यांना त्यांच्या चॅट स्क्रीनमध्ये अजूनही संदेश दिसतील.
स्वतःसाठी संदेश हटविण्यासाठी हे करा :
WhatsApp चालू करा आणि तुम्हाला जो संदेश हटवायचा आहे त्या चॅटमध्ये जा.
संदेशावर टॅप करून धरून ठेवा > मेनू मधून हटवा निवडा. तुम्ही एकावेळी अनेक संदेश सुद्धा निवडू शकता.