ग्रुप कसे तयार करावेत आणि ग्रुपमध्ये कसे आमंत्रित करावे
तुम्ही कमाल २५६ सदस्यांचा WhatsApp ग्रुप तयार करू शकता.
ग्रुप तयार करणे
WhatsApp उघडा आणि चॅट टॅबवर जा.
नवीन चॅट > नवीन ग्रुप वर टॅप करा.
जर तुमच्याकडे चॅट टॅबमध्ये अगोदरपासूनच चॅट उपलब्ध असेल तर, नवीन ग्रुप वर टॅप करा.
तुम्हाला ज्यांना ग्रुपमध्ये समाविष्ट करायचे आहे, ते संपर्क शोधा किंवा निवडा. त्यानंतर पुढे वर टॅप करा.
ग्रुपला नाव द्या. हे ग्रुपचे नाव असेल, जे सर्व सहभागी सदस्यांना दिसेल.
ग्रुपच्या नावामध्ये जास्तीतजास्त २५ कॅरॅक्टर्स असू शकतात.
तुम्ही कॅमेरा चिन्हावर टॅप करून ग्रुप आयकॉन जोडू शकता. इमेज जोडण्यासाठी फोटो घ्या, फोटो निवडा किंवा वेबवर शोधा या पर्यायांपैकी एक पर्याय निवडा. इमेज निवडून सेट केल्यावर, चॅट टॅबमधील ग्रुपच्या नावासमोर ग्रुप आयकॉन दिसू लागेल.
सर्व झाल्यावर तयार करा वर टॅप करा.
लिंक वापरून ग्रुपमध्ये आमंत्रित करणे
तुम्ही ग्रुप ॲडमीन असल्यास, तुम्ही लोकांसोबत लिंक शेअर करून त्यांना ग्रुपमध्ये आमंत्रित करू शकता. ॲडमीन जुनी निमंत्रण लिंक अवैध करून नवी लिंक तयार करण्याकरिता कधीही लिंक रिसेट करू शकतात.
WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
किंवा, चॅट टॅबवरील ग्रुपला डावीकडे स्वाइप करा. त्यानंतर, अधिक > ग्रुपची माहिती वर टॅप करा.
लिंकद्वारे ग्रुपमध्ये आमंत्रित करा वर टॅप करा.
लिंक पाठवण्यासाठी लिंक शेअर करा, लिंक कॉपी करा किंवा क्यु आर कोड या पर्यायांमधून एक पर्याय निवडा.
टीप: तुम्ही ज्या कोणत्याही WhatsApp वापरकर्त्यांसोबत आमंत्रण लिंक शेअर करत आहात, ते वापरकर्ते त्या लिंकच्या मदतीने ग्रुपमध्ये सामील होऊ शकतात. त्यामुळे हे फीचर केवळ तुमच्या विश्वासातल्या व्यक्तींसोबतच वापरा. कारण, या व्यक्ती तुमची लिंक इतरांनाही फॉरवर्ड करू शकतात आणि लिंक मिळालेल्या इतर व्यक्तींना ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी ग्रुप ॲडमीनच्या संमतीची गरज लागत नाही.