चॅट कसे पुसायचे
चॅट पुसणे हे वैशिष्ट्य तुम्हाला चॅट मधील सर्व संदेश पुसू देते. तुमच्या चॅट टॅब मधील यादीमध्ये चॅट अजूनही दिसतील.
वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट पुसणे
- चॅट टॅबमध्ये, तुम्हाला पुसायच्या असलेल्या वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटवर डावीकडे स्वाइप करा.
- अधिक > चॅट पुसा वर टॅप करा.
- तारांकित सोडून सर्व हटवा किंवा सर्व संदेश हटवा वर टॅप करा.
सर्व चॅट एकाचवेळी पुसणे
- WhatsApp मध्ये सेटिंग्ज > चॅट > सर्व चॅट पुसा येथे जा.
- तुमचा फोन नंबर एंटर करा > सर्व चॅट पुसा टॅप करा.