तुम्ही iCloud वापरून WhatsApp वरील पूर्वीच्या चॅटचा बॅकअप घेऊ शकता आणि ते रिस्टोअर करू शकता.
टीप:
तुम्ही तुमच्या चॅट्सचा मॅन्युअल बॅकअप कधीही घेऊ शकता.
यासाठी WhatsApp च्या सेटिंग्ज > चॅट > चॅट बॅकअप > बॅकअप घ्या यावर जा.
ऑटो बॅकअप वर टॅप करून आणि बॅकअपची वारंवारता निवडून तुम्ही ठरावीक काळाने ऑटोमॅटिक पद्धतीने घेतले जाणारे बॅकअप्स सुरू करू शकता.
याने तुमची चॅट्स व मीडिया फाइल्स यांचा बॅकअप तुमच्या iCloud खात्यावर घेतला जाईल. बॅकअपमध्ये व्हिडिओंचा बॅकअप घ्यायचा आहे की नाही, हे तुम्ही ठरवू शकता. iCloud बॅकअप प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ तुमचे इंटरनेट कनेक्शन आणि बॅकअप साइझ यावर अवलंबून आहे.
तुम्हाला तुमच्या मोबाइल डेटाच्या वापराविषयी चिंता वाटत असेल, तर तुम्ही वाय-फाय कनेक्शन उपलब्ध असतानाच iCloud बॅकअप घ्यावा असे आम्ही सुचवतो.
तुम्ही यापूर्वी iCloud किंवा iTunes वापरून तुमच्या iPhone वर बॅकअप घेतला असल्यास, तुम्ही तुमचा iPhone मागील बॅकअपवर रिस्टोअर करून तुमचे WhatsApp चॅट परत मिळवू शकता. तुमच्या iPhone चा बॅकअप घेणे आणि तो रिस्टोअर करणे याविषयी माहिती हवी असल्यास Apple सपोर्ट वेबसाइटवर जा.
तुम्हाला एखादे चॅट सेव्ह करायचे असल्यास तुम्ही पूर्वीचे चॅट ईमेलमधून स्वतःला पाठवू शकता.
टीप: जर तुम्ही जर्मनीत असाल, तर 'चॅट एक्स्पोर्ट करा' हे फीचर वापरण्याअगोदर तुम्हाला WhatsApp अपडेट करावे लागू शकते.