वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅट संग्रहित किंवा असंग्रहित कसे करावे
तुमची संभाषणे चॅट लिस्टमध्ये नीटनेटकी दिसण्यासाठी, 'चॅट संग्रहित करा' हे फीचर वापरून तुम्ही तुमच्या चॅट लिस्टमधून वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅट लपवून ठेऊ शकता.
टीप:
- चॅट संग्रहित केल्याने ते हटवले जात नाही किंवा iCloud वर त्याचा बॅकअपदेखील घेतला जात नाही.
- संग्रहित केलेली वैयक्तिक चॅट्स किंवा ग्रुप चॅट्स ही तुम्हाला त्या वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटमध्ये नवीन मेसेजेस आल्यावरदेखील संग्रहितच राहतील.
- चॅट स्क्रीनच्या सर्वात वर स्क्रोल करून तुम्ही वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटमध्ये किती नवीन मेसेजेस आले आहेत हे पाहू शकता.
चॅट किंवा ग्रुप संग्रहित करणे
- चॅट टॅबमध्ये, तुम्हाला संग्रहित आहे त्या चॅट किंवा ग्रुपवर डावीकडे स्वाइप करा.
- संग्रहित करा वर टॅप करा.
तुम्ही WhatsApp सेटिंग्ज > चॅट > सर्व चॅट्स संग्रहित करा मध्ये सर्व चॅट्स एकाचवेळी संग्रहित करू शकता.
संग्रहित चॅट्स किंवा ग्रुप चॅट्स पाहणे
- चॅट स्क्रीनच्या वरपर्यंत स्क्रोल करा.
- संग्रहित चॅट्स वर टॅप करा.
चॅट किंवा ग्रुप असंग्रहित करणे
- संग्रहित चॅट स्क्रीनवर, तुम्हाला संग्रहित करायचे आहे त्या चॅटवर किंवा ग्रुपवर डावीकडे स्वाइप करा.
- असंग्रहित करा वर टॅप करा.
तुम्ही संपर्काचे नाव किंवा त्या संपर्काचे मेसेज शोधून स्वत:च चॅट असंग्रहित करू शकता :
- चॅट टॅब मध्ये, शोध चौकटीवर टॅप करा.
- तुम्हाला जे चॅट असंग्रहित करायचे आहे, त्याचे नाव किंवा त्यातील एखादा मजकूर एंटर करा.
- तुम्हाला जे चॅट असंग्रहित करायचे आहे त्यावर उजवीकडे स्वाइप करा.
- असंग्रहित करा वर टॅप करा.
वैकल्पिक संग्रहण सेटिंग्ज
नवीन मेसेजेस प्राप्त झाल्यावर संग्रहित चॅट्स असंग्रहित व्हावीत यासाठी डिफॉल्ट सेटिंग्ज बदलण्याकरिता हे करा:
- WhatsApp सेटिंग्ज उघडा.
- चॅट वर टॅप करा.
- चॅट्स संग्रहित राहू देत बंद करा.
संबंधित लेख:
पुढील प्लॅटफॉर्म्सवर चॅट किंवा ग्रुपला संग्रहित किंवा असंग्रहित कसे करावे: Android | वेब आणि डेस्कटॉप | KaiOS