ग्रुपमध्ये सदस्य कसे जोडावेत आणि ग्रुपमधून सदस्य कसे काढावेत
जर तुम्ही ग्रुप ॲडमिन असाल, तर तुम्ही ग्रुपमध्ये सदस्य जोडू किंवा काढू शकता.
सदस्य जोडणे
- WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
- किंवा, चॅट टॅबवरील ग्रुपला डावीकडे स्वाइप करा. त्यानंतर, अधिक > ग्रुपची माहिती वर टॅप करा.
- सदस्य जोडा
वर टॅप करा. - तुम्हाला ज्यांना ग्रुपमध्ये समाविष्ट करायचे आहे, ते संपर्क शोधा किंवा निवडा.
- जोडा > जोडा यावर टॅप करा.
सदस्यांना काढणे
- WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
- किंवा, चॅट टॅबवरील ग्रुपला डावीकडे स्वाइप करा. त्यानंतर, अधिक > ग्रुपची माहिती यावर टॅप करा.
- ज्या सदस्याला हटवायचे आहे त्यांच्या नावावर टॅप करा.
- ग्रुपमधून काढून टाका > काढून टाका वर टॅप करा.