कार्ट वापरून ऑर्डर कशी द्यावी
WhatsApp वर एखाद्या बिझनेसचा कॅटलॉग पाहात असताना बिझनेससोबत संभाषण सुरू करण्यासाठी तुम्ही बिझनेसला मेसेज करा बटण वापरू शकता किंवा तुम्ही पाहात आहात ते प्रॉडक्ट ऑर्डर करायचे असल्यास कार्टमध्ये जोडा बटण वापरू शकता.
कार्टमध्ये प्रॉडक्ट जोडणे
- WhatsApp उघडा.
- बिझनेससोबतच्या चॅटवर किंवा ज्या बिझनेसला ऑर्डर द्यायची आहे त्या बिझनेसच्या प्रोफाइलवर जा.
- बिझनेसचा कॅटलॉग उघडण्यासाठी बिझनेसच्या नावापुढे असलेल्या शॉपिंग बटण आयकॉन
वर टॅप करा. - कॅटलॉग उघडल्यानंतर वेगवेगळी प्रॉडक्ट्स दिसतील, त्यामधून ब्राउझ करा.
- तुम्हाला आवडलेल्या प्रॉडक्टवर टॅप करा.
- तुम्हाला ऑर्डर करावेसे वाटते अशा प्रॉडक्टवरील कार्टमध्ये जोडा वर टॅप करा.
- किंवा, त्या प्रॉडक्टबद्दल काही विचारायचे असल्यास तुम्ही बिझनेसला मेसेज करा वरदेखील टॅप करू शकता.
तुमची कार्ट संपादित करणे
- तुमच्या कार्टमध्ये जोडलेली सर्व प्रॉडक्ट्स पाहण्यासाठी कार्ट आयकॉनवर टॅप करा.
- पुन्हा कॅटलॉगवर जाऊन आणखी प्रॉडक्ट्स जोडायची असल्यास आणखी जोडा वर टॅप करा.
- तुम्ही तुमच्या कार्टमध्ये प्रत्येक प्रॉडक्टचे किती नग असावेत हेदेखील संपादित करू शकता.
ऑर्डर करणे
- तुमची कार्ट यशस्वीरीत्या अपडेट केल्यानंतर, तुम्ही ती WhatsApp मेसेज म्हणून विक्रेत्याला पाठवू शकता.
- कार्ट पाठवल्यानंतर तुम्ही तुमच्या आणि विक्रेत्याच्या चॅट विंडोमधील कार्ट पहा या बटणावर टॅप करून तुमच्या ऑर्डरचे तपशील पाहू शकता.
तुम्हाला विक्रेत्याच्या कॅटलॉगमध्ये सूचीबद्ध केलेल्या एकाहून अधिक प्रॉडक्ट्सविषयी चौकशी करायची असल्यास, तुम्ही ती सर्व प्रॉडक्ट्स तुमच्या कार्टमध्ये जोडू शकता आणि एकाच मेसेजमध्ये तुमचे प्रश्न पाठवू शकता. विक्रेत्याने कन्फर्म करेपर्यंत ऑर्डर पूर्ण होत नाही.
तुमच्या कार्टमध्ये प्रॉडक्ट्स कशी जोडावीत, यावरील अधिक माहितीसाठी हे इन्फोग्राफिक डाउनलोड करा.
संबंधित लेख:
- कार्टविषयी माहिती
- कार्ट वापरून Android वर ऑर्डर कशी द्यावी