WhatsApp वर स्टोरेज कसे मोकळे करावे
तुमच्या डिव्हाइसवर WhatsApp किती जागा वापरत आहे हे तुम्ही पाहू शकता आणि फाइल्स हटवून स्टोरेज मोकळे करू शकता.
स्टोरेज पाहणे
- WhatsApp सेटिंग्ज वर जा.
- स्टोरेज आणि डेटा > स्टोरेज व्यवस्थापित करा वर टॅप करा.
तुमच्या डिव्हाइसवर 'WhatsApp मीडिया' आणि 'ॲप्स आणि इतर फाइल्स' ने किती जागा वापरली आहे हे स्क्रीनच्या सर्वात वर दाखवले जाते.
फाइल्स पाहणे आणि हटवणे
आकाराने मोठ्या असलेल्या फाइल्स किंवा अनेक वेळा फॉरवर्ड केलेल्या फाइल्स हटवून तुम्ही स्टोरेज मोकळे करू शकता. तुम्ही चॅटनुसार देखील फाइल्स हटवू शकता.
फाइल्स पाहणे
- WhatsApp सेटिंग्ज वर जा.
- स्टोरेज आणि डेटा > स्टोरेज व्यवस्थापित करा वर टॅप करा.
- 5 MB पेक्षा मोठ्या फाइल्स, अनेक वेळा फॉरवर्ड केलेल्या फाइल्स वर टॅप करा किंवा विशिष्ट चॅट निवडा.
- तुम्ही सर्वात नवीन, सर्वात जुन्या किंवा सर्वात मोठ्या साइझच्या फाइल्स या क्रमाने लावण्यासाठी क्रमाने लावा चिन्हावर टॅप करू शकता.
- फाइलचा साइझ फाइलच्या सर्वात वर कोपऱ्यात दाखवला जातो.
- फाइल पाहण्यासाठी तिच्यावर टॅप करा.
फाइल्स हटवणे
तुम्ही एखादी फाइल हटवण्याची निवड केल्यास, ती तुमच्या WhatsApp मीडियामधून हटवली जाईल. हटवलेल्या फाइल्स अजूनही तुमच्या डिव्हाइसवर इतरत्र सेव्ह केलेल्या असू शकतात. तुमच्याकडे फाइलच्या एकाहून अधिक प्रती असल्यास, तुम्हाला जागा मोकळी करण्यासाठी सर्व प्रती हटवणे गरजेचे असेल.
- WhatsApp सेटिंग्ज वर जा.
- स्टोरेज आणि डेटा > स्टोरेज व्यवस्थापित करा वर टॅप करा.
- 5 MB पेक्षा मोठ्या फाइल्स, अनेक वेळा फॉरवर्ड केलेल्या फाइल्स किंवा विशिष्ट चॅट निवडा वर टॅप करा.
- तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
- सर्व फाइल्स निवडणे: तुम्हाला एकाचवेळी सर्व फाइल्स हटवायच्या असल्यास, सर्व निवडा वर टॅप करा.
- फाइल्स स्वतंत्रपणे हटवणे: तुम्हाला हटवायच्या असलेल्या फाइलवर टॅप करा. एकाचवेळी अनेक फाइल्स हटवण्यासाठी, अतिरिक्त फाइल्स निवडा
- हटवा
वर टॅप करा - तुम्ही तारांकित केलेल्या फाइल्स निवडल्यास, तुम्ही तारांकित सोडून इतर सर्व हटवा किंवा सर्व फाइल्स हटवा निवडू शकता.
- फाइल हटवा किंवा फाइल्स हटवा वर टॅप करा.
- तुम्ही डुप्लिकेट फाइल्स निवडल्यास, फाइल आणि कोणत्याही प्रती हटवा किंवा फाइल्स आणि कोणत्याही प्रती हटवा वर टॅप करा.
शोध वापरून फाइल्स हटवणे
तुम्ही 'शोध' फीचर वापरून स्वतंत्र फाइलदेखील हटवू शकता.
- चॅट टॅबवर, शोध बार पहाण्यासाठी खाली स्वाइप करा.
- फोटो, व्हिडिओ किंवा डॉक्युमेंट्स वर टॅप करा.
- तुम्हाला हटवायच्या असलेल्या फाइलवर टॅप करा.
- हटवा
> माझ्यासाठी हटवा वर टॅप करा.
स्टोरेज कमी असल्याचे अलर्ट्स
तुमच्या डिव्हाइसवर उपलब्ध असलेले स्टोरेज अतिशय कमी झाल्यास, WhatsApp ला कदाचित योग्यरीत्या काम करता येणार नाही. असे घडल्यास, तुम्हाला ॲप वापरता यावे यासाठी WhatsApp तुम्हाला जागा मोकळी करण्यासाठी सूचना देऊ शकते.
तुम्ही वापरत नसलेली ॲप्स किंवा मोठे व्हिडिओ, फोटो अथवा तुमच्या फोनवर सेव्ह केलेल्या फाइल्स हटवून देखील तुम्ही जागा मोकळी करू शकता. WhatsApp च्या बाहेर तुमच्या फोनवर जागा मोकळी कशी करायची याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी, कृपया 'Apple सपोर्ट' वेबसाइटला भेट द्या.
संबंधित लेख:
- Android वर WhatsApp वरील स्टोरेज कसे मोकळे करावे
- फॉरवर्ड करण्यावरील मर्यादांविषयी माहिती