तुम्ही असेही करू शकता, नवीन गप्पा > नवीन गट येथे टॅप करा.
ज्या संपर्कांना गटामध्ये जोडायचे आहे ते निवडा किंवा त्यांना शोधा. हिरव्या बरोबरच्या खुणेवर टॅप करा.
गट विषय लिहा. हे गटाचे नाव असेल जे सर्व सहभागी सदस्यांना दिसेल.
विषय मर्यादा २५ कॅरॅक्टर्स इतकी आहे.
तुम्ही इमोजी वर टॅप करून विषयामध्ये इमोजी समाविष्ट करू शकता.
तुम्ही असेही करू शकता, कॅमेरा चिन्हावर टॅप करा आणि गट चिन्ह जोडा. प्रतिमा जोडण्यासाठी कॅमेरा, गॅलरी किंवा वेबवर शोधा यामधून तुम्ही निवड करू शकता. एकदा सेट केले की, गप्पा टॅब समोर गट चिन्ह दिसू लागेल.
हे करून झाले की हिरव्या बरोबरच्या खुणेवर टॅप करा.
लिंक वापरून गटासाठी आमंत्रण देणे
जर तुम्ही गट ॲडमीन असाल तर, गटासाठीची आमंत्रण लिंक वापरून तुम्ही लोकांना गटामध्ये आमंत्रित करू शकता. गट आमंत्रण लिंक शेअर करण्यासाठी :
WhatsApp गट गप्पा वर जा आणि त्यानंतर गट विषयावर टॅप करा.
तुम्ही असेही करू शकता, गप्पा टॅब मध्ये जाऊन गटावर वर टॅप करून होल्ड करा. त्यानंतर अधिक पर्याय > गट माहिती वर टॅप करा.
लिंक वापरून आमंत्रण द्या वर टॅप करा.
WhatsApp द्वारे लिंक पाठवा, लिंक कॉपी करा किंवा इतर ॲप द्वारे लिंक शेअर करा यामधून निवड करा.
अधिक पर्याय > गटाचा क्यु आर कोड प्रिंट करा वर टॅप करून क्यु आर कोड वापरून देखील गट आमंत्रण लिंक तुम्ही शेअर करू शकता.
WhatsApp द्वारे पाठवत असल्यास संपर्क निवडा किंवा संपर्काचा शोध घ्या, त्यानंतर पाठवा टॅप करा.
क्यु आर कोड प्रिंट करण्यासाठी तुमचा फोन प्रिंटरशी कनेक्ट करणे गरजेचे आहे.
ज्या Android वापरकर्त्यांना कोड प्राप्त झाला असेल ते प्राप्तकर्ते तृतीय पक्षी क्यु आर कोड रीडर वापरून कोड स्कॅन करू शकतात.
iPhone वापरकर्ते क्यु आर कोड स्कॅन करण्यासाठी त्यांच्या फोनचा कॅमेरा वापरू शकतात.
लिंक मागे घ्या वापरून आमंत्रण लिंक कधीही मागे घेता येऊ शकते आणि नवीन लिंक तयार करता येऊ शकते.
टीप : ज्या कोणत्या WhatsApp वापरकर्त्याकडे ही आमंत्रण लिंक असेल ते गटामध्ये सामील होऊ शकतात त्यामुळे हे फिचर केवळ विश्वासार्ह संपर्कांबरोबरच वापरा. ही लिंक इतरांना फॉरवर्ड करता येऊ शकते. अशा वेळी इतर कोणीही गटामध्ये सामील होऊ शकते आणि त्यासाठी गट ॲडमीनची परवानगी विचारली जाणार नाही.