गप्पा हटविणे
गप्पा हटविणे हे तुम्हाला तुमच्या गप्पा टॅब मधून संभाषणे हटवू देते.
एखादे वैयक्तिक संभाषण हटविण्यासाठी
- गप्पा टॅब मध्ये, तुम्हाला ज्या गप्पा हटवायच्या आहे त्यावर टॅप करून धरून ठेवा.
- हटवा
> हटवा वर टॅप करा.
गट गप्पा हटविण्यासाठी
गट गप्पा हटविण्यासाठी, प्रथम तुम्ही त्या गप्पांमधून बाहेर येणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही त्या गप्पा हटवू शकता.
- गप्पा टॅबमध्ये, तुम्हाला ज्या गप्पा हटवायच्या आहेत त्यावर टॅप करून धरून ठेवा.
- अधिक पर्याय
> गटामधून बाहेर पडा > बाहेर पडा वर टॅप करा.
- गट गप्पावर टॅप करून धरून ठेवा आणि हटवा
> हटवा वर टॅप करा.
सर्व गप्पा एकाचवेळी हटविण्यासाठी
- गप्पा टॅब मध्ये अधिक पर्याय
> सेटिंग्ज > गप्पा > गप्पा इतिहास वर टॅप करा.
- सर्व गप्पा हटवा टॅप करा. वैयक्तिक गप्पा तुमच्या गप्पा टॅब तसेच स्टेटस अपडेट मधून हटविता येतील. गट गप्पा, त्या अजूनही तुमच्या गप्पा टॅब मध्ये दिसतील, आणि तुम्ही त्याचा एक भाग असाल.
गप्पा पुसणे
गप्पा पुसणे हे तुम्हाला गप्पांमधील सर्व संदेश पुसू देतो. तुमच्या गप्पा टॅब मधील यादीमध्ये गप्पा अजूनही दिसतील.
वैयक्तिक किंवा गट गप्पा पुसण्यासाठी
- गप्पा टॅबमध्ये, तुम्हाला पुसायचे असलेले चॅट उघडा.
- अधिक पर्याय
> अधिक > गप्पा पुसा > पुसा येथे टॅप करा.
सर्व गप्पा एकाचवेळी पुसण्यासाठी
- गप्पा टॅब मध्ये अधिक पर्याय
> सेटिंग्ज > गप्पा > गप्पा इतिहास वर टॅप करा.
- सर्व गप्पा पुसा वर टॅप करा. हे तुमच्या गप्पांमधील सर्व संदेश पुसेल. तुमच्या गप्पा टॅब मध्ये अजूनही सर्व गप्पा असतील.
यांवर गप्पा कशा हटवायच्या आणि पुसायच्या याविषयी जाणून घ्या : iPhone | Windows Phone