व्हॉइस कॉलिंग द्वारे WhatsApp वापरून तुम्ही तुमच्या संपर्कांना विनाशुल्क कॉल करू शकता अगदी ते परदेशात असतील तरीही. व्हॉइस कॉलिंग तुमच्या सेल्युलर योजनेच्या आवाज मिनिटांऐवजी तुमच्या फोनचे इंटरनेट कनेक्शन वापरते. डेटा शुल्क लागू शकते. सध्या, व्हॉइस कॉलिंग iOS 7+ असलेल्या iPhone वर उपलब्ध आहे.
टीप : तुम्ही WhatsApp द्वारे आपात्कालीन सेवा नंबर ॲक्सेस करू शकता (उदा. भारतामध्ये 100). आपात्कालीन कॉल करण्यासाठी, तुम्ही पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे.
व्हॉइस कॉल करण्यासाठी :
तुम्हाला व्हॉइस कॉल करायचा असलेल्या संपर्कासह चॅट चालू करा.
व्हॉइस कॉल वर टॅप करा.
व्हॉइस कॉल घेण्यासाठी
तुमचा फोन लॉक असल्यास, कोणीतरी तुम्हाला व्हॉइस कॉल केल्यावर तुम्हाला इनकमिंग WhatsApp ऑडिओ... स्क्रीन दिसेल, जेथे तुम्ही हे करू शकता :
निळे ॲरो बटण उजवीकडे स्वाइप करून उत्तर देण्यासाठी स्लाइड करा.
मी निघत असताना किंवा 1 तासामध्ये तुम्हाला आठवण करून द्यायची असल्यास मला आठवण करून द्या वर टॅप करा आणि निवडा.
iPhone साइड बटण दोनदा दाबून कॉल नाकारा.
तुमचा फोन अनलॉक असल्यास, कोणीतरी तुम्हाला व्हॉइस कॉल केल्यावर तुम्हाला इनकमिंग WhatsApp ऑडिओ... स्क्रीन दिसेल, जेथे तुम्ही हे करू शकता:
स्वीकारण्यासाठी निळ्या चेक बटणावर टॅप करा.
नाकारा वर टॅप करा.
मी निघत असताना किंवा 1 तासामध्ये तुम्हाला आठवण करून द्यायची असल्यास मला आठवण करून द्या वर टॅप करा आणि निवडा.
त्वरित संदेशासह कॉल नाकारण्यासाठी संदेश पाठवा वर टॅप करा.
व्हॉइस कॉल मधून व्हिडिओ कॉल मध्ये स्विच करणे
व्हॉइस कॉल मधून व्हिडिओ कॉल मध्ये स्विच करण्यासाठी :
व्हॉइस कॉलवर असताना, व्हिडिओ कॉल वर टॅप करा.
तुम्ही व्हॉइस कॉल करत असलेल्या व्यक्तीला व्हिडिओ कॉलवर स्विच करण्याची विनंती दिसेल आणि ते स्विच स्वीकारू किंवा नाकारू शकतात.
व्हिडिओ कॉल मधून व्हॉइस कॉल मध्ये स्विच करण्यासाठी :
व्हिडिओ कॉलवर असताना, कॅमेरा बंद करावर टॅप करा, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कॉलिंग करत असलेल्या संपर्काला सूचित केले जाईल.
जेव्हा दुसरी व्यक्ती त्यांचा कॅमेरा बंद करते तेव्हा तो कॉल व्हॉइस कॉल मध्ये स्विच होतो.
ग्रुप व्हॉइस कॉल करणे
ग्रुप कॉलिंग WhatsApp वापरून चार सदस्यांना एकमेकांना व्हॉइस कॉल करू देते.
ग्रुपमधून ग्रुप व्हॉइस कॉल करण्यासाठी :
तुम्हाला व्हॉइस कॉल करायचा असलेल्या ग्रुप वर जा.
नवीन कॉल वर टॅप करा.
तुम्हाला कॉलवर जो संपर्क समाविष्ट करायचा आहे, तो निवडा किंवा शोधा.
व्हॉइस कॉल वर टॅप करा.
कॉल्स टॅबमधून ग्रुप व्हॉइस कॉल करण्यासाठी :
कॉल्स टॅब वर जा.
नवीन कॉल > नवीन ग्रुप कॉल वर टॅप करा.
तुम्हाला कॉलवर जो संपर्क समाविष्ट करायचा आहे, तो निवडा किंवा शोधा.
व्हॉइस कॉल वर टॅप करा.
वैयक्तिक चॅट मधून ग्रुप व्हॉइस कॉल करण्यासाठी :
ज्या संपर्काला व्हॉइस कॉल करायचा आहे त्याबरोबरचे चॅट चालू करा.
व्हॉइस कॉल वर टॅप करा.
संपर्काने कॉल घेतल्यावर, व्यक्ती जोडा वर टॅप करा.
तुम्हाला जो नंबर समाविष्ट करायचा आहे, तो निवडा किंवा शोधा.
जोडा वर टॅप करा.
टीप :
ग्रुप व्हॉइस कॉल करत असताना किंवा येत असताना तुमच्याकडे आणि तुमच्या संपर्कांकडे उत्तम इंटरनेट कनेक्शन असल्याची खात्री करा. खराब कनेक्शन असलेल्या संपर्कावर व्हॉइस कॉलची गुणवत्ता आधारित असेल.
जेव्हा तुम्हाला ग्रुप व्हॉइस कॉल येतो, तेव्हा तुम्हाला WhatsApp ऑडिओ... अशी स्क्रीन दिसेल आणि त्यामध्ये सध्या कॉलमध्ये असलेले सहभागी दिसतील. ज्या सदस्याने तुम्हाला त्या कॉल मध्ये समाविष्ट केले त्यांचे नाव प्रथम दिसेल.
ग्रुप व्हॉइस कॉल चालू असताना, तुम्ही व्हिडिओ कॉल मध्ये स्विच करू शकणार नाही.
ग्रुप व्हॉइस कॉल दरम्यान तुम्ही संपर्क काढू शकत नाही. संपर्काला कॉल मधून डिस्कनेक्ट करण्यासाठी त्यांचा फोन ठेवणे आवश्यक आहे.
कॉल टॅब मध्ये ग्रुप व्हॉइस कॉल इतिहास दिसेल. कॉल मधून वैयक्तिक संपर्क पाहाण्यासाठी तुम्ही कॉल इतिहासावर टॅप करू शकता.
तुम्ही ब्लॉक केलेल्या एखाद्या बरोबर ग्रुप व्हॉइस कॉल मध्ये असणे शक्य असेल तरी, तुम्ही ब्लॉक केलेल्या संपर्काला किंवा तुम्हाला ब्लॉक केलेल्या संपर्काला कॉलमध्ये जोडू शकत नाही.
पुढील प्लॅटफॉर्म्सवर व्हॉइस कॉल कसे करायचे ते जाणून घ्या : Android | Windows Phone