तुम्हाला WhatsApp वरील संदेश सुरळीतपणे मिळण्यासाठी तुमचा फोन योग्यप्रकारे व्यवस्थापित करणे गरजेचे आहे.
तुमच्या फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन आहे का हे तपासून बघा
हे तुम्ही तुमचा ब्राऊझर उघडून एखाद्या वेबसाईट वर जाऊन तपासू शकता. जर ब्राऊझिंग योग्यप्रकारे चालले नाही तर कृपया कनेक्शन विषयी समस्यांबद्दल असलेले हे उपाय करून बघा.
जर ब्राऊझर चालत असेल आणि WhatsApp चालत नसेल तर कृपया तुम्ही तुमच्या मोबाइल प्रदाता आणि सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटर यांच्याशी संपर्क साधा आणि तुमचे APN आणि राउटर योग्य प्रकारे कॉन्फीगर केले आहेत का हे तपासा ज्यामुळे नॉन-वेब आणि सॉकेट कनेक्शनला अनुमती मिळेल. तुम्ही दुसरे एखादे कनेक्शन देखील वापरून बघू शकता. जर तुम्ही वाय-फाय शी जोडलेले असाल तर मोबाइल डेटा वापरून बघा किंवा जर मोबाइल डेटा वापरत असाल तर वाय-फाय वापरून बघा.
खात्री करून घ्या की पार्श्वभूमी डेटा प्रतिबंधित केलेला नाही
- तुमच्या फोनवर सेटिंग्ज ॲप > ॲप्स > WhatsApp > डेटा वापर.
- खात्री करून घ्या की बॅकग्राउंड डेटा अर्थात पार्श्वभूमी डेटा प्रतिबंधित केलेला नाही.
- वरील सर्व पायऱ्यांचा Google सर्व्हिसेस साठी देखील वापर करा.
आणखी काही उपाय
- तुमचा फोन रिस्टार्ट करा किंवा तो बंद करून परत चालू करा.
- तुमच्या फोनवर पुढील प्रमाणे ॲप चे प्राधान्य निवडा WhatsApp > मेनू बटण > ॲप प्राधान्यता रिसेट करा.
- ऊर्जा बचत मोड सुरु करणे टाळा त्यासाठी तुमचा फोन चार्जिंगला लावूनच ठेवा.
- WhatsApp वेब वरून लॉग आउट व्हा WhatsApp वेब > सर्व संगणकावरून लॉग आउट करा.
- निष्क्रियता काळात वाय-फाय चालू ठेवा त्यासाठी तुमच्या फोनच्या सेटिंग्ज ॲप > वाय-फाय > सेटिंग्ज चिन्ह > निष्क्रियता काळात वाय-फाय चालू ठेवा > नेहमी हे सेट करा.
- टास्क किलर असल्यास ते अनइंस्टॉल करा. त्यामुळे तुम्ही जेव्हा ॲप वापरत नसता तेव्हा संदेश प्राप्त होण्यास प्रतिबंध होतो.
- Hangouts ॲप सुरू करा, आणि तुमच्या सर्व खात्यांमधून साइन आउट व्हा. त्यानंतर Hangouts परत सुरू करा आणि तुमच्या खात्यात परत प्रवेश करा.
ठराविक डिव्हाइसेस साठी सूचना
OS 4.1 – 4.4
- खात्री करून घ्या की तुमच्या फोन मध्ये ऑटो सिन्क डेटा चालू वर सेट केलेले नाही त्यासाठी तुमच्या फोनवर सेटिंग्ज ॲप > डेटा वापर > मेनू बटण > ऑटो सिन्क डेटा हे सेटिंग बंद ठेवा.
- खात्री करून घ्या की तुम्ही वाय-फाय ऑप्टिमायझेशन हे बंद ठेवले आहे त्यासाठी तुमच्या फोनवर सेटिंग्ज ॲप > वाय-फाय > मेनू बटण > प्रगत > वाय-फाय ऑप्टिमायझेशन हे बंद ठेवा.
OS 6.0+
- खात्री करून घ्या की तुम्ही व्यत्यय आणू नका हे बंद वर सेट केलेले आहे किंवा तुम्ही तुम्ही WhatsApp नोटिफिकेशन्सला प्राधान्य मोडमध्ये परवानगी दिलेली आहे त्यासाठी सेटिंग्ज ॲप > ध्वनी > व्यत्यय आणू नका हे सेट करा.
- खात्री करून घ्या की तुम्ही सर्व WhatsApp नोटिफिकेशन्सला परवानगी दिलेली आहे त्यासाठी सेटिंग्ज ॲप > ॲप्स > WhatsApp > परवानग्या हे सेट करा.
जर वरील उपायांचा उपयोग झाला नसेल तर हे शक्य आहे की तुम्हाला Google द्वारे पाठविल्या जाणारी नोटिफिकेशन्स अद्यतने मिळत नसतील.