आमचे Business API वापरून तुम्हाला WhatsApp वर ग्राहकांशी जोडले जाण्यात स्वारस्य असल्यास तुम्ही आमच्या या सूचीतील WhatsApp Business सोल्युशन प्रोव्हायडर्स (BSP) सह काम करावे, असे आम्ही सुचवतो. ते जगभरात असलेले, WhatsApp Business API मध्ये सराईत असलेले तृतीय पक्ष सोल्युशन प्रोव्हायडर्स आहेत. हे BSP तुम्हाला WhatsApp वरील तुमच्या ग्राहकांशी संपर्क साधण्यात मदत करू शकतात ज्यामुळे तुम्हाला कस्टमर सपोर्टचा मान्यताप्राप्त वापर करणे आणि वेळेच्या बाबतीत संवेदनशील असणाऱ्या वैयक्तिक नोटिफिकेशन्स वापरणे शक्य होईल.
आमच्या व्हाइट पेपर मध्ये नमूद केल्याप्रमाणे, जे तृतीय पक्ष आमच्या प्लॅटफॉर्म्सवर अनधिकृत सेवा पुरवत आहेत जसे की ऑटोमेटेड किंवा बल्क मेसेज पाठवणे, असे करून ते आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन करत आहेत. तुम्ही अनधिकृत सेवा पुरवणाऱ्या तृतीय पक्षासोबत काम करत असल्यास, तुम्हाला त्यांच्यासोबत WhatsApp वर मेसेजेस पाठवता येणार नाही. तुम्ही आमच्या अधिकृत BSP बरोबर काम करावे अशी आम्ही शिफारस करतो.
टीप: शेअर केलेली BSP ची सूची ही फक्त संदर्भ म्हणून दिली आहे. ज्या कंपनीबरोबर काम करू इच्छित आहात त्यांच्या कायदेशीर अधिकृततेबद्दल तुम्ही स्वतः शहानिशा करून घ्यावी असे आम्ही सुचवितो.