आमच्या ब्लॉग मध्ये केलेल्या घोषणेनुसार, WhatsApp तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या बिझनेसशी कनेक्ट करण्याचे नवीन मार्ग शोधत आहे. WhatsApp Business ॲपमुळे लहान बिझनेसना स्वतःचे अधिकृत अस्तित्व निर्माण करण्यात मदत होते आणि ग्राहकांना प्रतिसाद देणे सोपे होते.
एअरलाइन्स, ई-कॉमर्स साइट्स आणि बॅंक्स यासारख्या मोठ्या पातळीवर काम करणाऱ्या कंपन्यांसाठीदेखील आम्ही नवीन टूल्स तयार करत आहोत. हे बिझनेस ग्राहकांना फ्लाइटच्या वेळा, डिलिव्हरीचे कन्फर्मेशन आणि इतर अपडेट्स यांसारखी उपयुक्त माहिती देण्यासाठी तसेच, ग्राहकांना मदत करण्यासाठी WhatsApp Business ची ही टूल्स वापरू शकतील.
एखाद्या बिझनेसने तुमच्याशी संपर्क साधू नये असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही त्यांना ब्लॉक करू शकता. पुढील प्लॅटफॉर्म्सवर संपर्क ब्लॉक किंवा अनब्लॉक कसे करावेत ते जाणून घ्या: Android | iPhone