अनेक बिझनेस बऱ्याचदा तुम्हाला मेसेजेस पाठवण्यासाठी किंवा तुमच्याकडून आलेले मेसेजेस व्यवस्थापित करण्यासाठीचे साधन म्हणून एखाद्या सोल्युशन प्रोव्हायडरची मदत घेऊ शकतात. हे सोल्युशन प्रोव्हायडर्स बिझनेसला येणारे मेसेजेस वाचणे, ते स्टोअर करणे आणि त्यांना प्रतिसाद देणे अशा सेवा त्या बिझनेसच्या वतीने देऊ शकतात.
काही बिझनेस आणि सोल्युशन प्रोव्हायडर्स1 ग्राहकांचे मेसेजेस स्टोअर करण्यासाठी किंवा त्यांना प्रतिसाद देण्यासाठी WhatsApp ची पालक कंपनी असलेल्या Facebook चा वापर करतील. तुम्हाला कोणत्या जाहिराती दिसाव्यात हे ठरवण्यासाठी Facebook तुमचे मेसेजेस ऑटोमॅटिकली वापरणार नाही, मात्र बिझनेसला त्यांना प्राप्त झालेले मेसेजेस/चॅट्स त्यांच्या मार्केटिंग व जाहिरातीसाठी वापरता येतील व त्यामध्ये Facebook वरील जाहिरातीचाही समावेश असू शकतो. एखाद्या बिझनेसची गोपनीयता धोरणे काय आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही त्या बिझनेसशी संपर्क साधू शकता.
1 २०२१ मध्ये.