WhatsApp Business प्रॉडक्ट्सविषयी माहिती
WhatsApp Business प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी अद्याप उपलब्ध झालेला नाही असे असू शकते. WhatsApp Business प्लॅटफॉर्मसाठी आमच्या मदतपर आशयाची लायब्ररी येथे पहा.
तुमच्या बिझनेसला ग्राहकांशी जोडण्याचे अनेक मार्ग शोधण्याकरिता WhatsApp वचनबद्ध आहे.
तुमचा लहान बिझनेस असेल, तर तुम्ही मोफत डाउनलोड करण्याकरिता उपलब्ध असलेल्या ॲपद्वारे एकाच डिव्हाइसमधून ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी WhatsApp Business ॲप वापरू शकता. Business ॲपमुळे बिझनेसेसना शेकडो ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची, ते विनामूल्य वापरता येण्याची आणि इतर टूल्ससह मर्यादित कस्टमायझेशन व इंटिग्रेशनची सुविधा मिळते.
तुमचा बिझनेस मध्यम ते मोठ्या बिझनेसेसमध्ये मोडत असल्यास, तुम्ही WhatsApp बिझनेस प्लॅटफॉर्मच्या मदतीने WhatsApp वर मोठ्या प्रमाणात संभाषणे व्यवस्थापित करू शकता आणि तात्पर्याने ग्राहकांच्या खरेदी निर्णयात मदत करून त्यांच्याशी विश्वासाचे संबंध प्रस्थापित करू शकता. बिझनेसेसना WhatsApp बिझनेस प्लॅटफॉर्मला थेट ॲक्सेस करता येते किंवा तुमच्या वतीने इंटिग्रेट करण्यासाठी बिझनेस सोल्युशन प्रोव्हायडरसोबत काम करता येते.
एखाद्या बिझनेसने तुमच्याशी संपर्क साधू नये असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही त्यांना ब्लॉक करू शकता. पुढील प्लॅटफॉर्म्सवर संपर्कांना ब्लॉक कसे करावे किंवा त्यांची तक्रार कशी नोंदवावी हे जाणून घ्या: Android | iPhone