WhatsApp Business प्रॉडक्ट्सविषयी माहिती
WhatsApp Business प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी अद्याप उपलब्ध झालेला नाही असे असू शकते. WhatsApp Business प्लॅटफॉर्मसाठी आमच्या मदतपर आशयाची लायब्ररी येथे पहा.
तुमच्या बिझनेसला ग्राहकांशी जोडण्याचे अनेक मार्ग शोधण्याकरिता WhatsApp वचनबद्ध आहे.
तुम्ही लघुउद्योजक असल्यास, तुमचा वेळ वाचवण्यासाठी आणि तुमचे लक्ष तुमच्या ग्राहकांशी कनेक्ट होण्यावर व तुमचा बिझनेस वाढवण्यावर केंद्रित करण्यासाठी तुम्ही WhatsApp Business ॲपची अभिनव फीचर्स वापरू शकता. बिझनेस प्रोफाइल आणि कॅटलॉग ही त्या फीचर्सपैकी काही मुख्य फीचर्स आहेत.
तुमच्या कंपनीचा विस्तार मोठा असल्यास, तुम्ही फ्लाइटच्या वेळा, डिलिव्हरी कन्फर्मेशन्स, इतर महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि कस्टमर सपोर्ट यांसारखी उपयुक्त माहिती देण्यासाठी WhatsApp Business प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता.
नवीन बिझनेस फीचर्स आणि टूल्स यांविषयीची नवीनतम अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमचा ब्लॉग पहा.
एखाद्या बिझनेसने तुमच्याशी संपर्क साधू नये असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही त्यांना ब्लॉक करू शकता. पुढील प्लॅटफॉर्म्सवर संपर्कांना ब्लॉक कसे करावे किंवा त्यांची तक्रार कशी नोंदवावी हे जाणून घ्या: Android | iPhone