तुमचे WhatsApp खाते एकावेळी एकाच डिव्हाईसवर एकच फोन नंबर वापरून सत्यापित करता येते. जर तुमच्याकडे dual SIM फोन असेल तर तर कृपया हे लक्षात घ्या की तुम्हाला तरीसुद्धा WhatsApp खाते पडताळण्यासाठी एकच नंबर वापरावा लागेल. एकच WhatsApp खाते दोन फोन नंबर वर असणे शक्य करण्याचा कोणताही मार्ग नाही.
जर तुम्ही अनेकवेळा निरनिराळ्या डिव्हाइसेस वर WhatsApp खाते पडताळण्याचा प्रयत्न केलात तर एका विशिष्ट क्षणी अनेकवेळा खाते पडताळणी प्रक्रिया करण्यात आली म्हणून तुम्ही ब्लॉक देखील केले जाऊ शकता. कृपया अनेकवेळा डिव्हाईसेस आणि नंबरमध्ये अदलाबदली करू नका.