आवश्यक गोष्टी
- जो फोन नंबर तुमचा स्वतःचा असतो त्याचीच पडताळणी तुम्ही करू शकता. यासाठी तुम्ही मोबाइल नंबर किंवा लँडलाइन (स्थिर) नंबर वापरू शकता.
- तुम्ही ज्या फोन नंबरची पडताळणी करत आहात, त्या फोन नंबरवर तुम्हाला फोन कॉल्स आणि SMS येतात का, याची खात्री करून घेता आली पाहिजे.
- तुमचे कॉल ब्लॉकिंग सेटिंग, ॲप्स किंवा टास्क किलर्स हे सर्व 'बंद' वर सेट असायला हवे.
- तुम्ही मोबाइल फोनद्वारे तुमच्या नंबरची पडताळणी करत असाल तर मोबाइल डेटा किंवा वाय-फायच्या रुपात तुमच्याकडे सक्रिय इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे. तुम्ही रोमिंगमध्ये असाल किंवा कनेक्शन चांगले नसेल, तर ही पडताळणी व्यवस्थित पार पडणार नाही. तुमच्या फोनवरील इंटरनेट ब्राउझरवरून https://www.whatsapp.com/business/ उघडा आणि तुमचे इंटरनेट कनेक्शन नीट चालते आहे का ते पहा.
- तुम्ही लँडलाइनवरून पडताळणी करत असाल तर, पडताळणी कोड प्राप्त करण्यासाठी मला कॉल करा वर टॅप करा.
पडताळणी कशी कराल
- तुमचा फोन नंबर एंटर करा:
- ड्रॉप-डाउन लिस्टमधून तुमचा देश निवडा. यामुळे डावीकडे तुमचा कंट्री कोड आपोआप एंटर होईल.
- उजवीकडील चौकटीमध्ये मोबाइल नंबर एंटर करा. तुमच्या फोन नंबर अगोदर 0 लावू नका.
- पुढे वर टॅप करून पडताळणी कोड प्राप्त करा. सूचना दिसल्यास, तुम्ही मला कॉल करा वापरून फोन कॉलद्वारेही कोड प्राप्त करू शकता.
एसएमएस किंवा फोन कॉलमार्फत मिळालेला ६-अंकी पडताळणी कोड एंटर करा.
लँडलाइनसाठी एक्स्टेंशन नंबर वापरणे
पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या प्रक्रियेमध्ये लँडलाइन एक्स्टेंशन नंबरला सपोर्ट नाही. तुमच्या फोन नंबरच्या पडताळणीसाठी तुमच्या लँडलाइन नंबरचे एक्स्टेंशन वापरू नका. सुरक्षेच्या उद्देशाने, तुमच्या बिझनेस खात्यासाठी तुम्ही जो नंबर वापरणार असाल केवळ त्याच लँडलाइन नंबरवर ६-अंकी पडताळणी कोड पाठवला जातो.
जर तुम्हाला एसएमएस द्वारे ६-अंकी कोड मिळाला नाही
- प्रोग्रेस बार संपेपर्यंत प्रतीक्षा करा आणि पडताळणी प्रक्रिया परत करून पहा. याकरिता साधारण १० मिनिटे लागू शकतात त्यामुळे, कृपया धीर धरा.
- कृपया, पडताळणी कोड अंदाजाने ओळखण्याचा प्रयत्न करू नका. असे केल्यास तुम्हाला ठराविक काळासाठी लॉक आउट केले जाईल.
तुम्हाला कोड मिळण्याअगोदरच टायमर संपून गेला, तर फोन कॉलमधून कोड मिळवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. कॉलची विनंती करण्यासाठी मला कॉल करा हा पर्याय निवडा. तुम्ही कॉलला उत्तर द्याल तेव्हा, एक ऑटोमेटेड आवाज तुम्हाला ६-अंकी पडताळणी कोड सांगेल. WhatsApp Business मध्ये हा कोड टाका.
- टीप : तुमच्या कॅरिअरनुसार तुम्हाला SMS किंवा फोन कॉलसाठी शुल्क लागू शकते.
समस्यांचे निराकरण
तुम्हाला पडताळणी प्रक्रियेमध्ये अडचणी येत असतील तर, खालील उपाय करून बघा:
- तुमचा फोन रीबूट करा (फोन रीबूट करण्यासाठी तो बंद करा, ३० सेकंद प्रतीक्षा करा आणि तो परत सुरु करा).
- WhatsApp Business ची जुनी आवृत्ती हटवून नवीन आवृत्ती इंस्टॉल करा.
तुम्हाला मेसेज व्यवस्थित मिळत आहेत का हे पाहण्यासाठी तुम्ही ज्या मोबाइल नंबरची पडताळणी करत आहात त्या फोन नंबरवर कोणत्याही मोबाइलवरून एक चाचणी एसएमएस पाठवून बघा. यामुळे तुमच्याकडे चांगले कनेक्शन आहे की नाही हे तपासता येईल. (यासाठी तुमच्या स्वतःच्या फोनवर तुम्ही ज्या स्वरूपात कंट्री कोड सहित तुमचा WhatsApp Business नंबर लिहिला आहे, त्याच पद्धतीने लिहा).
- टीप: सुरक्षिततेच्या कारणास्तव आम्ही तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने तुमचा कोड पाठवू शकत नाही.