Apple App Store मधील WhatsApp च्या गोपनीयता लेबलविषयी माहिती
Apple ने अलीकडेच त्यांच्या App Store मधील सर्व ॲप्सनी लोकांचा डेटा कसा वापरला जाऊ शकतो ते त्यांना दाखवणारे तपशील दाखवावेत अशी सूचना केली. आम्ही पारदर्शकतेचे समर्थन करतो आणि म्हणूनच आम्ही लोकांना त्यांच्या खात्याशी संबंधित माहिती डाउनलोड करण्यासाठी पर्याय दिलेला आहे. WhatsApp वर आमच्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो आणि WhatsApp वरील प्रत्येक संभाषणाच्या सुरूवातीला त्यांना याची जाणीव करून देतो.
२०१६ मध्ये आम्ही आमच्या संपूर्ण ॲपवर एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन समाविष्ट केले. याचाच अर्थ तुम्ही मित्रमैत्रिणी आणि कुटुंब सदस्यांना केलेले कॉल्स, मेसेजेस, पाठवलेले फोटो, व्हिडिओ व व्हॉइस नोट्स फक्त तुम्हाला हव्या असलेल्या व्यक्तीसोबतच शेअर केले जाते; इतर कोणीही (अगदी आम्हीही) ते वाचू शकत नाही. एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनचे संरक्षण लाभलेले मेसेजेस इच्छित व्यक्तीला डिलिव्हर झाल्यानंतर आमच्या सर्व्हरवर स्टोअर केले जात नाहीत आणि एरव्हीदेखील तुम्ही कोणाला मेसेज करता याचे रेकॉर्ड आम्ही ठेवत नाही.
जागतिक स्तरावरील विश्वासार्ह संभाषण सर्व्हिस प्रदान करण्यासाठी आम्हाला काही माहिती गोळा करणे आवश्यक आहे. मुळातच आम्ही कमीत कमी कॅटेगरीजमधील डेटा गोळा करतो. हा गोळा केलेला मर्यादित प्रकारचा डेटा सुरक्षित राहावा यासाठी आम्ही त्या माहितीचा ॲक्सेस प्रतिबंधित करण्यासाठी उपाययोजना करतो. उदाहरणार्थ, तुम्ही आम्हाला मेसेज पाठवण्यासाठी तुमचे संपर्क ॲक्सेस करण्याची अनुमती दिली असली तरीदेखील, आम्ही तुमचे संपर्क कोणासोबतही शेअर करत नाही, Facebook च्या वापरासाठीदेखील नाही. आमच्या मदत केंद्रामधील, गोपनीयता धोरण आणि सेवा अटी यांमध्ये याबद्दल अधिक स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
खाली आम्ही Apple च्या App Store वर दाखवल्या जाणाऱ्या WhatsApp लेबलविषयी माहिती तसेच, एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने संरक्षित न केलेल्या डेटाविषयी अतिरिक्त माहिती दिली आहे. लोक वापरण्याचा पर्याय निवडू शकतात अशाच बाबींना खालीलपैकी बऱ्याच गोष्टी लागू होतात हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आम्ही खालील सर्व गोष्टींबद्दलची माहिती आपोआप गोळा करत नाही. यापैकी अनेक पर्यायी फीचर्स, जसे की शॉपिंग आणि पेमेंट्स, केवळ WhatsApp वर आहेत आणि इतर एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन मेसेजिंग प्रोव्हायडर्सद्वारे दिली जात नाहीत.
- संपर्क माहिती: तुम्ही WhatsApp साठी साइन-अप करता तेव्हा आम्हाला तुमचा फोन नंबर मिळतो. तुमच्या डिव्हाइसवर मेसेज पाठवण्यासाठी आम्ही या नंबरवर अवलंबून असतो. तुम्हाला टू-स्टेप व्हेरिफिकेशन सुरू करायचे असल्यास तुम्ही तुमचा ईमेल ॲड्रेस WhatsApp सह शेअर करण्याचा पर्याय निवडू शकता; मात्र हे आवश्यक नाही. आणखी मदत हवी असल्यास तुम्ही WhatsApp ला ईमेलदेखील करू शकता.
- आयडेंटिफायर्स: आम्ही तुमचा फोन नंबर WhatsApp वापरकर्ता आयडी म्हणून वापरतो. त्यामुळेच, तुमचा फोन WhatsApp शी कनेक्ट होताना कोणता IP ॲड्रेस वापरला जातो हे आम्हाला माहीत असते.
- सर्वसाधारण लोकेशन: आम्हाला तुमचे अचूक लोकेशन कधीही दिसत नसले तरीही, आम्हाला तुमच्या फोन नंबरवरून तुमचा IP ॲड्रेस आणि देशाचा कोड माहीत असतो.
- संपर्क: तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंब सदस्यांना मेसेज करणे सोपे व्हावे यासाठी, तुम्ही WhatsApp साठी साइन-अप करता तेव्हा आम्ही तुमच्या फोन नंबर्सचा ॲक्सेस मागतो, जेणेकरून आमच्या सिस्टीम्समध्ये त्यातील कोणत्या नंबर्सची पडताळणी झाली आहे हे आम्हाला कळावे. तुम्ही ॲक्सेस द्यायचे ठरवल्यास, ॲप तुम्ही तुमच्या ॲड्रेस बुकमधून निवडलेली नावे प्रदर्शित करते. कृपया लक्षात घ्या की, आम्ही ही माहिती Facebook सोबत शेअर करत नाही. येथे अधिक जाणून घ्या.
- वापराविषयीचा डेटाजागतिक स्तरावरील एक विश्वासार्ह सर्व्हिस चालवण्यासाठी आमची फीचर्स उपयुक्त ठरत आहेत की नाही हे आम्हाला समजणे आवश्यक आहे. पण, वापरकर्त्याची ओळख पटेल अशी माहिती मिळवण्याचा समावेश नसेल अशा रीतीने हे काम करण्याच्या पद्धतींची आम्ही चाचणी करत आहोत. गैरवापर टाळण्यासाठी आम्ही बल्क किंवा ऑटोमेटेड मेसेजिंग करणाऱ्या खात्यांविरुद्ध कारवाई करतो. असा गैरवापर विशेषतः निवडणुकांच्या वेळी होतो. निवडणुकांच्या काळात काही ग्रुप्स मोठ्या प्रमाणात मेसेजेस पाठवण्याचा प्रयत्न करतात. सध्या WhatsApp वापरत नसलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही मार्केटिंग कॅंपेन्स प्रायोजित करतो, तसेच Apple चे ॲड नेटवर्कदेखील वापरतो. आम्ही ॲप वापरकर्त्यांना नवीन प्रॉडक्ट्सची फीचर्स, अपडेट्सविषयी कळवतो, तसेच लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठीही ॲपचा वापर करतो.
- डायग्नोस्टिक्स: तुम्हाला WhatsApp संबंधित काही समस्या आल्यास आम्हाला क्रॅश लॉग मिळतो, जेणेकरून आम्ही बगशी संबंधित समस्यांचे निराकरण करू शकू आणि त्या अनुषंगाने आमच्या सर्व्हिसमध्ये सुधारणा करू शकू.
आम्ही खालील अतिरिक्त पर्याय देऊ करतो:
- आर्थिक माहिती: ज्या देशांमध्ये तुम्ही WhatsApp मार्फत पेमेंट्स पाठवू शकता, तेथे ट्रान्झॅक्शन पूर्ण करण्यासाठी तुमच्या कार्डची किंवा बँकेची माहिती देणे आवश्यक आहे.
- खरेदी: तुम्ही WhatsApp वरील Facebook Shops वापरायचे ठरवल्यास, तुम्ही बघितलेली आणि खरेदी केलेली प्रॉडक्ट्स यांसारखी तुमची खरेदीची माहिती आम्हाला समजू शकते आणि Shops हे Facebook चे प्रॉडक्ट असल्यामुळे आम्ही ही माहिती Facebook सह शेअर करतो. याचा अर्थ 'शॉप्स'मधील प्रॉडक्ट ब्राउझिंग आणि खरेदी अनुभवाचा तुम्हाला Facebook वरील इतर प्रॉडक्ट्सच्या शॉप्समध्ये काय दिसेल यावर परिणाम होऊ शकतो. WhatsApp वर Facebook शॉप्सचा वापर करण्यापूर्वी आम्ही तुम्हाला याची माहिती देतो आणि तुम्ही त्यास सहमती देता का हे विचारतो.
- वापरकर्ता आशय: आम्ही तुमचा प्रोफाइल फोटो, ग्रुप्सची नावे, ग्रुप प्रोफाइल फोटो आणि ग्रुपविषयी माहिती तसेच तुमची "माझ्याविषयी" माहिती मिळवतो. आम्ही गैरवापरास प्रतिबंध करण्यासाठी आणि लहान मुलांचे शोषण दाखवणाऱ्या इमेजेस शेअर करणारी खाती बॅन करण्यासाठी या माहितीवर अवलंबून असतो. याव्यतिरिक्त, तुम्ही WhatsApp वर एखाद्या गोष्टीची तक्रार करता तेव्हा तुम्ही आम्हाला पाठवता ती निवडक माहिती आम्हाला मिळते.