तात्पुरता बॅन केलेल्या खात्यांविषयी माहिती
तुम्हाला ॲपमध्ये "तुमचे खाते तात्पुरते बॅन केले आहे" असा मेसेज मिळाल्यास, त्याचा अर्थ असा आहे, की तुम्ही अधिकृत WhatsApp ॲपऐवजी WhatsApp ची सपोर्ट नसलेली आवृत्ती वापरत आहात किंवा तुमच्यावर अस्वीकारार्ह मार्गांनी माहिती काढून घेण्याचा, म्हणजेच स्क्रॅपिंगचा, संशय आहे. तात्पुरता बॅन झाल्यानंतर तुम्ही अधिकृत ॲपवर स्विच न केल्यास किंवा स्क्रॅपिंग न थांबवल्यास, तुमचे खाते WhatsApp वापरण्यापासून कायमचे बॅन केले जाऊ शकते.
स्क्रॅपिंग म्हणजे परवानगी नसलेल्या कोणत्याही उद्देशासाठी ऑटोमेटेड किंवा मॅन्युअल टूल वापरून लक्ष्यित आणि मोठ्या प्रमाणावर माहिती काढून घेणे. अशा प्रकारे वापरकर्त्यांकडून फोन नंबर, वापरकर्त्यांचे प्रोफाइल फोटो आणि WhatsApp वरील स्टेटस यासारखी इतर माहिती काढून घेतल्यास आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन होते.
WhatsApp Plus, GB WhatsApp यांसारखी सपोर्ट नसलेली ॲप्स किंवा तुमची WhatsApp चॅट्स एका फोनमधून दुसऱ्या फोनमध्ये हलवण्याचा दावा करणारी ॲप्स, या सर्व WhatsApp च्या फेरफार केलेल्या अनधिकृत आवृत्त्या आहेत. ही अनधिकृत ॲप्स तृतीय पक्षांद्वारे तयार केलेली ॲप्स आहेत आणि ही ॲप्स आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन करतात. WhatsApp अशा तृतीय पक्षी ॲप्सना सपोर्ट करत नाही, कारण आम्ही त्यांच्या सुरक्षासंबंधी पद्धतींची ग्वाही देऊ शकत नाही.
अधिकृत WhatsApp कसे वापरावे
अधिकृत WhatsApp वर जाण्याअगोदर तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या चॅटचा बॅकअप घ्यावा लागेल. तुम्हाला पूर्वीचे चॅट ट्रान्सफर करावे लागेल की नाही, हे तुम्ही सपोर्ट नसलेले कोणते ॲप वापरत आहात यावर अवलंबून आहे. अधिक पर्याय > सेटिंग्ज > मदत > ॲप माहिती यावर टॅप करा आणि तुम्ही कोणते ॲप वापरत आहात हे जाणून घ्या. ॲपनुसार खालील पायऱ्या फॉलो करा: WhatsApp Plus किंवा GB WhatsApp.
Android वापरकर्त्यांसाठी - तुम्ही WhatsApp Plus किंवा GB WhatsApp याखेरिज दुसरे एखादे ॲप वापरत असल्यास, तुम्ही WhatsApp ची अधिकृत आवृत्ती डाउनलोड करण्याअगोदर तुमचे पूर्वीचे चॅट सेव्ह करावे असे आम्ही सुचवतो.
GB WhatsApp
तुमचे पूर्वीचे चॅट सेव्ह आणि ट्रान्सफर करण्यासाठी आम्ही तुम्हाला पुढील पायऱ्या फॉलो करण्याची शिफारस करतो. या पायऱ्या फॉलो न केल्यास तुमचे पूर्वीचे चॅट हरवण्याची शक्यता आहे. कृपया लक्षात घ्या, की WhatsApp अनधिकृत ॲप्सना सपोर्ट करत नसल्याने पूर्वीचे चॅट यशस्वीपणे ट्रान्सफर होईलच याची आम्ही कोणतीही हमी देऊ शकत नाही.
- तुमचा तात्पुरता बॅन संपण्याची प्रतीक्षा करा. टायमरमध्ये तुम्हाला बॅनचा कालावधी दिसेल.
- GB WhatsApp मध्ये अधिक पर्याय > चॅट्स > चॅट्सचा बॅकअप घ्या यावर टॅप करा.
- फोन सेटिंग्ज येथे जा आणि > स्टोरेज > फाइल्स यावर टॅप करा.
- GB WhatsApp फोल्डर शोधा आणि ते निवडण्यासाठी त्यावर टॅप करा व धरून ठेवा.
- वर उजवीकडील कोपऱ्यात आणखी > नाव बदला यावर टॅप करा आणि फोल्डरचे नाव बदलून "WhatsApp" करा.
- Play Store वर जा आणि अधिकृत WhatsApp ॲप डाउनलोड करा. तुम्ही Play Store ॲक्सेस करू शकत नसल्यास, या लिंकवरून ॲप डाउनलोड करा.
- WhatsApp मध्ये तुमच्या फोन नंबरची पडताळणी करा. पडताळणी कशी करावी हे जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
- 'बॅकअप आढळला' या स्क्रीनवर रिस्टोअर करा > पुढील यावर टॅप करा.
- यामुळे WhatsApp तुमच्या आधीच्या चॅट्ससह लोड व्हावे अशी अपेक्षा आहे.
WhatsApp Plus
तुम्ही तुमचे पूर्वीचे चॅट याआधीच सेव्ह केले असेल, तर ते आपोआप अधिकृत WhatsApp वर ट्रान्सफर होईल. तुमचे पूर्वीचे चॅट कसे सेव्ह करावे हे जाणून घेण्यासाठी मदत केंद्रास भेट द्या.
- Play Store वर जा आणि WhatsApp ॲप डाउनलोड करा. तुम्ही Play Store ॲक्सेस करू शकत नसल्यास, या लिंकवरून ॲप डाउनलोड करा.
- तुमच्या फोन नंबरची पडताळणी करा. पडताळणी कशी करावी हे जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.