तुम्ही ज्यांचा फोन नंबर तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुकमध्ये सेव्ह केला आहे आणि ज्यांनी तुमचा फोन नंबर त्यांच्या फोनच्या ॲड्रेस बुकमध्ये सेव्ह केला आहे असेच संपर्क तुमचे स्टेटस अपडेट्स पाहू शकतात. तुम्ही तुमचे स्टेटस अपडेट्स सर्व संपर्कांसह किंवा फक्त निवडक संपर्कांसह शेअर करण्याचा पर्याय निवडू शकता. तुमचे स्टेटस अपडेट्स बाय डीफॉल्ट तुमच्या सर्व संपर्कांसोबत शेअर केले जातात.
तुमच्या स्टेटसची गोपनीयता बदलण्यासाठी:
स्टेटस वर टॅप करा.
Android असल्यास: अधिक पर्याय > स्टेटस गोपनीयता यावर टॅप करा.
iPhone असल्यास: गोपनीयता वर टॅप करा.
खालीलपैकी एक पर्याय निवडा:
माझे संपर्क: तुमच्या सर्व संपर्कांना तुमचे स्टेटस अपडेट्स दिसतील.
हे सोडून बाकी सर्व संपर्क…: तुम्ही निवडलेले संपर्क सोडून इतर सर्व संपर्कांना तुमचे स्टेटस अपडेट्स दिसतील.
केवळ यांच्याबरोबर शेअर करा…: फक्त तुम्ही निवडलेल्या संपर्कांना तुमचे स्टेटस अपडेट्स दिसतील.
टीप:
तुमच्या गोपनीयता सेटिंग्जमधील बदलांचा तुम्ही आधीच पाठवलेल्या स्टेटस अपडेट्स वर परिणाम होणार नाही.
तुम्ही ‘वाचल्याच्या पोचपावत्या’ बंद केल्या असल्यास, तुमचे स्टेटस अपडेट कोणी पाहिले हे तुम्ही पाहू शकणार नाही. एखाद्या संपर्काने ‘वाचल्याच्या पोचपावत्या’ बंद केल्या असल्यास, त्यांनी तुमचे स्टेटस अपडेट पाहिले का हे तुम्ही पाहू शकणार नाही.
स्टेटस अपडेट्स Facebook स्टोरीज आणि इतर ॲप्सवर शेअर करणे
तुम्ही तुमचे स्टेटस अपडेट शेअर केले तर तुमच्या स्टेटस अपडेटमधील आशय इतर ॲप्ससोबत शेअर केला जाईल. तुम्ही तुमचे स्टेटस अपडेट शेअर करता तेव्हा WhatsApp तुमच्या खात्याची माहिती Facebook किंवा इतर ॲप्ससोबत शेअर करत नाही.
संबंधित लेख:
पुढील प्लॅटफॉर्म्सवर स्टेटस कसे वापरावे: Android | iPhone
WhatsApp स्टेटस अपडेट इतर ॲप्सवर कसे शेअर करावे हे जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.