WhatsApp हा एक खाजगी मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे जो लोकांना त्यांच्या मित्रमैत्रिणींना आणि आप्तेष्टांना एकमेकांना संदेश पाठविता येणे शक्य व्हावे यासाठी निर्माण करण्यात आला आहे. काही काळापासून आम्ही पहात होतो की लोकांना व्यवसायांबरोबर संदेशन करणे महत्त्वाचे वाटते आणि यासाठी आम्ही दोन नवीन साधने निर्माण केली WhatsApp Business ॲप आणि WhatsApp Business API - ज्यांच्या सहाय्याने कंपन्या त्यांच्या ग्राहकांसह होणारी संभाषणे व्यवस्थापित करू शकतात. आमची उत्पादने आम्ही 'बल्क आणि ऑटोमेटेड मेसेजिंग' अर्थात भरपूर संदेश आपोआप पाठविण्यासाठी निर्माण केलेली नाहीत. तसे करणे हे नेहमीच आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन समजले जाईल.
आमच्या प्लॅटफॉर्मचा खाजगीपणा हा गुणधर्म जपणे आणि वापरकर्त्यांना दुरुपयोगी गोष्टींपासून सुरक्षित ठेवणे यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. अशाप्रकारची खाती ओळखणे आणि त्यांना बॅन करणे यासाठीच्या आमच्या प्लॅटफॉर्मच्या क्षमता याविषयी सविस्तर विश्लेषण आम्ही या व्हाईट पेपर मध्ये केले आहे. आम्हाला कल्पना आहे की जरी आम्ही आमच्या मशीन लर्निंग सिस्टिम्स सुधारण्यासाठी अथक परिश्रम घेत असलो तरी काही कंपन्या या सिस्टिम्स वर आक्रमण करण्यासाठी सतत प्रयत्नात असतात. WhatsApp च्या प्लॅटफॉर्म वर जी माहिती उपलब्ध आहे त्याचा वापर करून आम्ही आमच्या सर्व्हिसेस मधून गैरवर्तन करणारी अनेक खाती शोधून काढून ती बॅन केली आहेत.
हे एक असे आव्हान आहे ज्यामध्ये समग्र दृष्टिकोन असणे गरजेचे आहे आणि WhatsApp कडे जे स्रोत उपलब्ध आहेत – ज्यामध्ये कायदेशीर कारवाई चा देखील समावेश आहे – त्यांचा वापर करून, 'बल्क आणि ऑटोमेटेड मेसेजिंग' किंवा 'अवैयक्तिक कारणासाठी वापर' यासारख्या आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रतिबंधित करणे यासाठी WhatsApp वचनबद्ध आहे. आणि म्हणूनच तांत्रिक साधनांबरोबरच आम्ही अशा व्यक्तींविरुद्ध किंवा कंपन्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई देखील करतो ज्यांनी आमच्या प्लॅटफॉर्म्सचा गैरवापर केला आहे असा सबळ पुरावा आमच्याकडे असतो. अशा परिस्थितींमध्ये कायदेशीर कारवाई करणे सुरू ठेवण्याचा अधिकार WhatsApp राखून ठेवते.
याव्यतिरिक्त, ७ डिसेंबर २०१९ पासून WhatsApp ने निर्धारित केलेल्या सेवाशर्तींचे उल्लंघन करणारे किंवा इतरांना गैरवापरासाठी चिथावणी देणारे किंवा बल्क मेसेजिंग किंवा अवैयक्तिक कारणासाठी वापर या कारणासाठी ज्यांना आम्ही दोषी ठरविले आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई करू. जरी ही निवड आमच्या प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध नसलेल्या म्हणजेच ऑफ प्लॅटफॉर्म माहितीवर निर्धारित केलेली असली तरीही. उदाहरणार्थ, आमच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नसलेली माहिती म्हणजे लोकांनी ज्या कंपन्यांबद्दल दावा करून नमूद केले आहे की त्या कंपन्या WhatsApp चा वापर अशा प्रकारे करतात की ज्यामुळे आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन होते. ही नोटीस आहे ज्यामध्ये आम्ही हे नमूद करू इच्छितो की जर या कंपन्यांनी ७ डिसेंबर २०१९ नंतर देखील गैरवापर चालू ठेवला तर आम्ही हे ऑफ प्लॅटफॉर्म उपलब्ध पुरावे वापरून किंवा या तारखे अगोदर या कंपन्यांबद्दल आमच्या प्लॅटफॉर्मवर जे पुरावे उपलब्ध आहेत ते वापरून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करू.
या नोटीस मध्ये असे कोठेही नमूद केलेले नाही की WhatsApp तांत्रिक पद्धतीने सेवाशर्ती लागू करण्याचा स्वतःचा अधिकार मर्यादित करेल. जसे की मशीन लर्निंग वापरून खाती बॅन करणे, अशा प्रकारची टेक्नोलॉजी पुढे देखील वापरली जाईल.
व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांशी संवाद साधता यावा यासाठी त्यांना कार्यक्षमता प्रदान करणे आम्ही चालू ठेऊ. या कार्यक्षमतांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी WhatsApp Business ॲप आणि WhatsApp Business API ही पाने वाचा.