WhatsApp वरील ऑटोमेटेड किंवा बल्क मेसेजिंगचा गैरवापर
WhatsApp हा एक खाजगी मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे, जो लोकांना त्यांच्या मित्रमैत्रिणींना आणि आप्तेष्टांना मेसेजेस पाठवता येणे शक्य व्हावे यासाठी निर्माण करण्यात आला आहे. बिझनेसेससोबत संपर्कात राहण्यासाठी मेसेजेस वापरणे लोकांना किती महत्त्वाचे वाटते हे आम्ही जाणतो आणि म्हणूनच कंपन्यांना ग्राहकांशी संवाद साधण्यात मदत व्हावी म्हणून आम्ही दोन टूल्स तयार केली आहेत– WhatsApp Business ॲप आणि WhatsApp Business प्लॅटफॉर्म. आमची प्रॉडक्ट्स आम्ही 'बल्क आणि ऑटोमेटेड मेसेजिंग' करिता, थोडक्यात भरपूर मेसेजेस आपोआप पाठवण्यासाठी निर्माण केलेली नाहीत. तसे करणे हे नेहमीच आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन समजले जाईल.
आमच्या प्लॅटफॉर्मचा खाजगीपणा हा गुणधर्म जपणे आणि वापरकर्त्यांना दुरुपयोगी गोष्टींपासून सुरक्षित ठेवणे यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. अशाप्रकारची खाती शोधून त्यांना बॅन करणे यासाठीच्या आमच्या प्लॅटफॉर्मच्या क्षमतांचे सविस्तर विश्लेषण या व्हाइट पेपर मध्ये केले आहे. आम्हाला कल्पना आहे की जरी आम्ही आमच्या मशीन लर्निंग सिस्टिम्स सुधारण्यासाठी अथक परिश्रम घेत असलो तरी काही कंपन्या या सिस्टिम्स वर आक्रमण करण्यासाठी सतत प्रयत्नात असतात. WhatsApp च्या प्लॅटफॉर्म वर जी माहिती उपलब्ध आहे त्याचा वापर करून आम्ही आमच्या सर्व्हिसेसमधून गैरवापर करणारी अनेक खाती शोधून काढून ती बॅन केली आहेत.
हे एक असे आव्हान आहे, ज्यामध्ये समग्र दृष्टिकोन असणे गरजेचे आहे. WhatsApp कडे जे स्रोत उपलब्ध आहेत – ज्यामध्ये कायदेशीर कारवाई चा देखील समावेश आहे – त्यांचा वापर करून 'बल्क आणि ऑटोमेटेड मेसेजिंग' किंवा 'वैयक्तिक नसलेल्या कारणांसाठी वापर' यांसारख्या आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रतिबंधित करणे यासाठी WhatsApp वचनबद्ध आहे. आणि म्हणूनच तांत्रिक साधनांबरोबरच आम्ही अशा व्यक्तींविरुद्ध किंवा कंपन्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई देखील करतो ज्यांनी आमच्या प्लॅटफॉर्म्सचा गैरवापर केला आहे असा सबळ पुरावा आमच्याकडे असतो. अशा परिस्थितींमध्ये कायदेशीर कारवाई करणे सुरू ठेवण्याचा अधिकार WhatsApp राखून ठेवते.
याव्यतिरिक्त, WhatsApp ने निर्धारित केलेल्या सेवाशर्तींचे उल्लंघन करणे किंवा इतरांना गैरवापरासाठी चिथावणी देणे अथवा बल्क मेसेजिंग करणे किंवा वैयक्तिक नसलेल्या कारणांसाठी वापर करणे या कारणांसाठी ज्यांना दोषी ठरवले आहे त्यांच्याविरुद्ध आम्ही ७ डिसेंबर २०१९ पासून कायदेशीर कारवाई करू, ही निवड आमच्या प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध नसलेल्या माहितीवर निर्धारित केलेली असली तरीही. उदाहरणार्थ, आमच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नसलेली माहिती म्हणजे लोकांनी ज्या कंपन्यांबद्दल दावा करून नमूद केले आहे की त्या कंपन्या WhatsApp चा वापर अशा प्रकारे करतात की ज्यामुळे आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन होते. या नोटीसमध्ये आम्ही हे नमूद करू इच्छितो, की या कंपन्यांनी ७ डिसेंबर २०१९ नंतरही गैरवापर सुरू ठेवला, तर आम्ही हे ऑफ प्लॅटफॉर्म उपलब्ध पुरावे वापरून किंवा या तारखेअगोदर या कंपन्यांबद्दल आमच्या प्लॅटफॉर्मवर जे पुरावे उपलब्ध आहेत ते वापरून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करू.
या नोटीसमध्ये असे कोठेही नमूद केलेले नाही, की WhatsApp सेवाशर्ती लागू करण्याचा स्वतःचा अधिकार मशीन लर्निंग वापरून खाती बॅन करणे अशा तंत्रज्ञानाच्या मदतीपुरता मर्यादित ठेवेल. अशा प्रकारचे तंत्रज्ञान WhatsApp यापुढेही वापरेल.
बिझनेसेसला त्यांच्या ग्राहकांशी संवाद साधता यावा यासाठी त्यांना अधिक कार्यक्षमता प्रदान करण्याचे प्रयत्न आम्ही यापुढेही सुरू ठेवू. या कार्यक्षमतांंविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, WhatsApp Business ॲप आणि WhatsApp Business प्लॅटफॉर्म पेजेसना भेट द्या.