फॉरवर्ड केलेला संदेश कोणता ते समजून घ्या
तुमच्या मित्राने किंवा तुमच्या नातेवाईकाने संदेश स्वतः लिहिला आहे की तो त्यांना दुसऱ्या कोणी पाठविलेला आहे हे "फॉरवर्ड केले" या लेबल मुळे समजण्यास मदत होते. जेव्हा एखादा संदेश एका वापरकर्त्याकडून दुसऱ्या वापरकर्त्याकडे पाच पेक्षा अधिक वेळा पाठविला जातो तेव्हा त्यासमोर दोन बाणांचे चिन्ह
फोटो आणि मीडिया काळजीपूर्वक तपासा
तुम्हाला चुकीची माहिती कळावी यासाठी फोटो, ऑडिओ आणि व्हिडिओ यामध्ये फेरफार केलेली असू शकते. ही बातमी इतर विश्वासार्ह प्रसारमाध्यमांकडे देखील रिपोर्ट केली गेली आहे का ते पहा. ही बातमी अनेक ठिकाणी प्रसारित होत असल्यास, ती सत्य असण्याची शक्यता अधिक असते.
विचित्र दिसणाऱ्या संदेशांकडे लक्ष ठेवा
फसवणुकीच्या किंवा खोट्या बातम्या असलेल्या अनेक संदेशांमध्ये शब्दलेखनाच्या चुका असतात. या संकेतांकडे बारीक लक्ष ठेवा त्यामुळे माहिती अचूक आहे किंवा नाही ते तुम्ही तपासू शकता. फसव्या संदेशांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, हा लेख वाचा.
तुमची मते पुन्हा एकदा तपासून पहा
तुमच्या पूर्वग्रहांना मान्यता दर्शविणारी माहिती असेल तर त्याकडे बारकाईने बघा आणि ती माहिती शेअर करण्याअगोदर त्याची सत्यता पडताळून घ्या. अशक्य आणि अविश्वसनीय वाटणाऱ्या बातम्या शक्यतो खोट्याच असतात.
खोट्या बातम्या सहसा व्हायरल होतात
केवळ अनेक वेळा संदेश शेअर केल्याने, तो सत्य होत नाही. केवळ पाठविणाऱ्याने तुम्हाला कळकळीची विनंती केली आहे म्हणून तो संदेश फॉरवर्ड करू नका. तुम्हाला जर खोटी माहिती फॉरवर्ड होऊन आली असेल तर ज्यांनी तुम्हाला ती पाठविली त्यांना संदेश पाठविण्याअगोदर त्यामधील माहिती तपासत जा असे सांगा. जर एखादा ग्रुप किंवा संपर्क सतत खोट्या बातम्या पाठवत असेल तर त्यांची तक्रार नोंदवा. संपर्क किंवा ग्रुपची तक्रार कशी नोंदवायची याविषयी अधिक माहिती हवी असल्यास हा लेख वाचा.
इतर माध्यमांद्वारे त्याची सत्यता पडताळून बघा
तुम्हाला अजूनही खात्री नसेल की आलेला संदेश खरा आहे की खोटा, तर ऑनलाईन जा आणि विश्वासार्ह वृत्तपत्रांच्या वेबसाईटवर जाऊन याविषयी माहिती मिळते का ते पहा. तुम्ही अजूनही साशंक असाल तर याविषयी ज्या व्यक्तींना खरोखर माहिती असेल अशा व्यक्तींना विचारा.
महत्त्वाचे : जर तुमच्या असे लक्षात आले की एखादी व्यक्ती भावनिक किंवा शारीरिक अत्याचारास बळी पडत आहे तर कृपया नजीकच्या कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. स्थानिक कायदा अंमलबजावणी अधिकारी याविषयी मदत करण्यासाठी तत्पर असतात.