एखाद्या संपर्काने तुम्हाला मेसेज पाठवला असेल, तर त्या मेसेजच्या जागी तुम्हाला कधीकधी वरील मेसेज दिसू शकतो. एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनमुळे तुम्हाला मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा फोन ऑनलाइन असण्याची आणि तुम्हाला पाठवलेला मेसेज नीट एन्क्रिप्ट होण्याची गरज असते. त्यामुळे, तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा मेसेज मिळण्यासाठी वाट पाहावी लागू शकते. तुम्ही ज्या व्यक्तीशी चॅट करत आहात त्या व्यक्तीने नुकतेच WhatsApp पुन्हा इंस्टॉल केले असल्यास असे होऊ शकते.
ही प्रक्रिया लवकर व्हावी यासाठी तुम्ही ज्या व्यक्तीला मेसेज करत आहात त्या व्यक्तीला त्यांच्या फोनवर WhatsApp उघडून सुरू ठेवण्यास सांगू शकता.
एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी कृपया आमचा व्हाइट पेपर आणि हा लेख पहा.