तुम्ही युरोपियन इकॉनॉमिक एरिया (ज्यामध्ये युरोपियन युनियनचा समावेश होतो) मधील देशात आणि अन्य कोणत्याही समाविष्ट केलेल्या देशात किंवा प्रांतामध्ये (ज्यास एकत्रितपणे युरोपियन प्रांत असे संबोधले जाते) राहात असल्यास, WhatsApp साठी नोंदणी करण्यासाठी आणि त्याचा वापर करण्यासाठी तुमचे वय किमान १६ वर्षे (किंवा तुमच्या देशात आवश्यक असलेले वय) असणे आवश्यक आहे.
तुम्ही युरोपियन प्रांतामधील देशाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही देशात राहात असल्यास, WhatsApp साठी नोंदणी करण्यासाठी आणि त्याचा वापर करण्यासाठी तुमचे वय किमान १३ वर्षे (किंवा तुमच्या देशात आवश्यक असलेले वय) असणे आवश्यक आहे.
कृपया अधिक माहितीसाठी आमच्या सेवाशर्ती पहा.
टीप:
तुमच्या अल्पवयीन बालकाने WhatsApp खाते तयार केल्यास, तुम्ही त्यांना त्यांचे खाते कसे हटवायचे ते दाखवू शकता. खाते कसे हटवावे हे शिकण्यासाठी मदत केंद्राला भेट द्या.
एखाद्या अल्पवयीन बालकाच्या खात्याची तक्रार करायची असल्यास, कृपया आम्हाला ईमेल पाठवा. तुमच्या ईमेलमध्ये कृपया खालील डॉक्युमेंट्स पुरवा आणि संबंधित नसलेली इतर कोणतीही वैयक्तिक माहिती संपादित करा किंवा लपवा:
WhatsApp खाते तुमच्या अल्पवयीन बालकाचे आहे असे सप्रमाण सिद्ध झाल्यास आम्ही ते खाते त्वरित बंद करू. तुम्हाला या कारवाईबद्दल कन्फर्मेशन मिळणार नाही. वर मागितलेली माहिती पूर्ण आणि योग्य पद्धतीने दिल्यास तक्रारीचे पुनरावलोकन करण्याच्या आणि त्यानुसार योग्य ती कारवाई करण्याच्या आमच्या क्षमतेत कमालीची सुधारणा होते.
ज्या खात्याबद्दल तक्रार नोंदवण्यात आली आहे ते खाते अल्पवयीन वापरकर्त्याचे आहे असे सिद्ध न झाल्यास आम्ही त्या खात्यावर कारवाई करू शकणार नाही. तुम्ही त्या लहान बालकाचे पालक नसल्यास, तुम्ही वरील सूचनांचा वापर करून त्या बालकाच्या पालकांना आमच्याशी संपर्क साधण्यास प्रोत्साहित करावे अशी आम्ही शिफारस करतो.