आम्ही Facebook Companies सोबत कसे काम करतो
हा लेख संग्रहित केला गेला आहे. अप-टू-डेट आशयाकरिता कृपया आमचे गोपनीयता धोरण पहा.
या लेखामध्ये, आम्ही युरोपियन प्रांतामधील आमच्या वापरकर्त्यांना अतिरिक्त माहिती देत आहोत.
Facebook Companies म्हणजे काय?
WhatsApp ही Facebook Companies अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. Facebook Companies मध्ये Facebook, Facebook Technologies आणि WhatsApp यांचा समावेश होतो व या कंपन्या एकत्रितपणे Facebook कंपनी प्रॉडक्ट्स ऑफर करतात.
WhatsApp हे Facebook Companies सोबत माहिती का शेअर करते?
WhatsApp मध्ये सुधारणा करण्यासाठी आणि WhatsApp व इतर Facebook Companies यांना सुरक्षित ठेवण्यात आम्हाला मदत करणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर, तंत्रज्ञान आणि सिस्टम यांसारख्या सर्व्हिसेस मिळवण्यासाठी WhatsApp इतर Facebook Companies सोबत मिळून काम करते आणि त्यांच्यासोबत माहिती शेअर करते. आम्हाला Facebook Companies कडून सर्व्हिसेस मिळतात तेव्हा, आम्ही त्यांच्यासोबत शेअर करत असलेली माहिती आमच्या सूचनांनुसार WhatsApp ला मदत करण्यासाठी वापरली जाते. एकत्र काम केल्यामुळे आम्हाला पुढील गोष्टी करता येतात. उदाहरणार्थ:
जगात कुठेही असा, तुम्हाला जलद आणि विश्वासार्ह मेसेजिंग आणि कॉल सर्व्हिस प्रदान करणे व आमच्या सेवा आणि फीचर्स कशी काम करत आहेत, याबद्दल जाणून घेणे.
स्पॅम खाती काढून टाकून आणि गैरवर्तन/गैरवापर करणाऱ्या ॲक्टिव्हिटीचा विरोध करून WhatsApp आणि Facebook कंपनी प्रॉडक्ट्समधील सुरक्षेची आणि अखंडतेची खात्री देणे.
तुमचा WhatsApp अनुभव Facebook कंपनी प्रॉडक्ट्सशी कनेक्ट करणे.
Facebook तुमच्या Facebook प्रॉडक्ट अनुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा तुम्हाला Facebook वर अधिक अनुरुप जाहिरात अनुभव देण्यासाठी तुमच्या WhatsApp खात्याची माहिती वापरत नाही. WhatsApp आणि इतर Facebook कंपनी प्रॉडक्ट्स वापरण्याच्या तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधून काढण्याकरिता आम्ही सतत प्रयत्नशील असतो. आम्ही ऑफर करत असलेल्या नवीन अनुभवांबद्दल आणि आमच्या डेटा वापराविषयी धोरणांबद्दल आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू.
Facebook Companies सोबत WhatsApp कोणती माहिती शेअर करते?
Facebook Companies कडून सेवा मिळवण्यासाठी WhatsApp त्यांच्या गोपनीयता धोरणातील "आम्ही गोळा करतो ती माहिती" विभागामध्ये तुमच्याबद्दल असलेली माहिती शेअर करते. उदाहरणार्थ, WhatsApp ला ॲनॅलिटिक्स सेवा प्रदान करण्यासाठी, Facebook आमच्या सूचनांनुसार WhatsApp च्या वतीने तुम्ही WhatsApp साठी साइन इन करताना पडताळणी केलेला फोन नंबर, तुमच्या डिव्हाइसची काही माहिती (तुमच्या डिव्हाइसशी किंवा खात्याशी संलग्न असलेले डिव्हाइस आयडेंटिफायर्स, ऑपरेटिंग सिस्टम आवृत्ती, ॲप आवृत्ती, प्लॅटफॉर्मसंबंधित माहिती, तुम्ही ज्या देशात मोबाइल वापरता आहात त्या देशाचा आणि नेटवर्कचा कोड व अपडेटचा स्वीकार आणि नियंत्रण निवडी यांचा ट्रॅक ठेवण्यासाठीचे फ्लॅग्स) आणि वापराबद्दलची काही माहिती (तुम्ही WhatsApp शेवटचे केव्हा वापरले, तुम्ही तुमचे खाते कोणत्या तारखेला नोंदणीकृत केले आणि तुम्ही कोणती फीचर्स वापरता व किती वेळा वापरता) यांवर प्रक्रिया करते.
Facebook Companies मध्ये सुरक्षितता आणि अखंडता यांचा प्रचार करणे आवश्यक असते तेव्हादेखील WhatsApp इतर Facebook Companies सोबत माहिती शेअर करते. यामध्ये एखादा विशिष्ट WhatsApp वापरकर्ता इतर Facebook कंपनी प्रॉडक्ट्स वापरत आहे का आणि अशा वापरकर्त्यांविरुद्ध किंवा त्यांना संरक्षित करण्यासाठी इतर Facebook Companies नी काही कार्यवाही करणे आवश्यक आहे का हे Facebook आणि इतर Facebook Companies यांना कळावे यासाठी माहिती शेअर करण्याचा समावेश आहे. यांसारखी Facebook वरील स्पॅमरविरुद्ध कारवाई करण्यासाठी Facebook ला आवश्यक असलेली माहिती, जसे की- घटने (नां)बद्दलची माहिती, स्पॅमरने WhatsApp साठी साइन अप करताना पडताळणीसाठी वापरलेला फोन नंबर किंवा त्याचे डिव्हाइस किंवा खाते यांच्याशी संलग्न डिव्हाइस आयडेंटिफायर्स , WhatsApp शेअर करू शकते. असे कोणतेही ट्रान्सफर आमच्या गोपनीयता धोरणातील "डेटावर प्रक्रिया करण्याची आमची कायदेशीर पद्धत" या विभागातील तरतुदींनुसार केले जाते.
Facebook Companies माझी WhatsApp माहिती कशाप्रकारे वापरतात?
बिझनेस ऑपरेट करणे, त्यामध्ये सुधारणा करणे आणि त्याचा विकास करणे यामध्ये WhatsApp ला मदत करणाऱ्या सर्व्हिसेस मिळवण्यासाठी. WhatsApp हे Facebook Companies सोबत या मार्गांनी माहिती शेअर करते, तेव्हा Facebook Companies सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून काम करतात आणि आम्ही त्यांच्यासोबत शेअर करत असलेली माहिती आमच्या सूचनांनुसार WhatsApp ला मदत करण्यासाठी वापरली जाते.
आम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर या नात्याने Facebook Companies सोबतदेखील माहिती शेअर करतो. सर्व्हिस प्रोव्हायडर्स WhatsApp सारख्या कंपन्यांना इंफ्रास्ट्रक्चर, तंत्रज्ञान, सिस्टम्स, टूल्स, माहिती आणि कौशल्य प्रदान करून वापरकर्त्यांना WhatsApp सर्व्हिस देण्यात आणि त्यामध्ये सुधारणा करण्यात मदत करतात.
असे केल्यामुळे आम्हाला आमच्या सेवा कशा वापरल्या जात आहेत आणि Facebook Companies मध्ये त्याचा कसा वापर होतो आहे हे समजण्यात मदत होते. तुम्ही WhatsApp साठी साइन अप करतेवेळी पडताळणी केलेला फोन नंबर आणि तुमचे खाते शेवटचे केव्हा वापरले गेले यांसारखी माहिती इतर Facebook Companies सोबत शेअर केल्याने एखादे विशिष्ट WhatsApp खाते Facebook Companies च्या इतर सर्व्हिसेस वापरते आहे किंवा नाही हे आम्हाला समजू शकते. यामुळे आमच्या सर्व्हिसेसमध्ये सुधारणा करण्यासाठी या माहितीचा अधिक अचूकपणे वापर करता येऊ शकतो. उदाहरणार्थ, लोक Facebook Companies मधील इतर ॲप्स किंवा सर्व्हिसेसच्या तुलनेत WhatsApp सर्व्हिसेस कशा वापरतात हे आम्हाला समजते आणि WhatsApp ला संभाव्य फीचर्समध्ये करण्यात किंवा प्रॉडक्ट्समध्ये सुधारणा करण्यात या माहितीचा वापर करता येतो. WhatsApp चे किती युनिक वापरकर्ते आहेत हेदेखील आम्ही मोजू शकतो. उदाहरणार्थ - आमचे कोणते वापरकर्ते Facebook ची इतर कोणतीही ॲप्स वापरत नाहीत आणि Facebook Companies मध्ये किती युनिक वापरकर्ते आहेत हे आम्हाला समजू शकते. यामुळे आम्हाला आमच्या WhatsApp सर्व्हिसवरील ॲक्टिव्हिटी अधिक चांगल्या रितीने समजून घेण्यात आणि तिचा अहवाल आमच्या गुंतवणूकदारांना आणि नियामक संस्थांना देण्यात मदत होईल.
आम्ही शाश्वत बिझनेसच्या निर्माणाचे मार्ग शोधत असल्यामुळे याचा WhatsApp ला फायदाच होतो. आम्ही याआधी घोषणा केल्याप्रमाणे, आम्ही लोकांना आणि बिझनेसेसना WhatsApp वापरून संवाद करता यावा यासाठी निरनिराळे मार्ग शोधत आहोत. हवे आहेत ते बिझनेस शोधण्यात आणि त्यांच्याशी WhatsApp द्वारे संवाद साधण्यात लोकांना मदत करण्यासाठी Facebook Companies सह काम करण्याचाही त्यामध्ये समावेश असू शकतो. अशाप्रकारे, वापरकर्त्यांना Facebook वर जे रोचक बिझनेसेस मिळतात, त्या बिझनेसेसशी त्यांना WhatsApp द्वारे संवाद साधता येऊ शकतो.
WhatsApp आणि इतर Facebook फॅमिली सर्व्हिसेस सुरक्षित ठेवण्यासाठी.
स्पॅम आणि आमच्या सेवांचा गैरवापर यांविरुद्ध लढण्यासाठी, आमच्या सेवा सुरक्षित ठेवण्यासाठी, आमच्या सेवांची सुरक्षितता आणि अखंडता यांचा प्रचार करण्यासाठी गोपनीयता धोरणातील "डेटावर प्रक्रिया करण्याची आमची कायदेशीर पद्धत" या विभागातील तरतुदींनुसार आम्ही इतर Facebook Companies सोबत माहिती शेअर करतो. उदाहरणार्थ, Facebook Companies च्या कोणत्याही सदस्याला कोणी त्यांच्या सेवा बेकायदेशीर कारणांसाठी वापरत असल्याचे आढळल्यास, त्या वापरकर्त्याचे खाते बंद केले जाऊ शकते आणि तसे इतर Facebook Companies नी करावे या उद्देशाने त्यांना सूचित केले जाऊ शकते. अशाप्रकारे, आम्ही आमच्या सेवा अटींचे उल्लंघन करणाऱ्या किंवा आमच्या वापरकर्त्यांच्या अथवा इतरांच्या सुरक्षेला धोका पोहोचवू शकणाऱ्या आणि ज्यांच्याबद्दल फॅमिलीतील इतर कंपन्यांना चेतावणी देणे आवश्यक आहे, फक्त अशा वापरकर्त्यांच्या बाबतीतील माहिती शेअर करतो.
WhatsApp आणि इतर Facebook Companies च्या सेवा सुरक्षित ठेवण्यासाठी, Facebook Companies वर त्या वापरकर्त्यांची कोणती खाती आहेत हे आम्हाला समजणे आवश्यक आहे. ही माहिती मिळाल्यास आम्ही आमच्या सेवा अटींचे उल्लंघन करणाऱ्या किंवा आमच्या वापरकर्त्यांच्या अथवा इतरांच्या सुरक्षेला धोका पोहोचवू शकणाऱ्या वापरकर्त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करू शकतो.
Facebook प्रॉडक्ट्समध्ये सुधारणा करण्यासाठी आणि तुम्हाला अधिक अनुरुप Facebook जाहिरात अनुभव देण्यासाठी आम्ही Facebook वर डेटा शेअर करत नाही.
- Facebook तुमच्या Facebook प्रॉडक्ट अनुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा तुम्हाला Facebook वर अधिक अनुरुप जाहिरात अनुभव देण्यासाठी तुमच्या WhatsApp खात्याची माहिती वापरत नाही. हे आयरिश डेटा संरक्षण आयोग आणि युरोपमधील इतर डेटा संरक्षण संस्थांसह चर्चा करण्याचे परिणाम आहेत. WhatsApp आणि इतर Facebook कंपनी प्रॉडक्ट्स वापरण्याच्या तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधून काढण्याकरिता आम्ही सतत प्रयत्नशील असतो. आम्ही भविष्यामध्ये या उद्देशाने असा डेटा Facebook Companies सोबत शेअर करण्याचा निर्णय घेतला तर आम्हाला डेटाचा तसा वापर करू देण्याकरिता आम्ही आयरिश डेटा संंरक्षण आयोगाशी चर्चा करू आणि त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून काही सकारात्मक निष्पन्न झाल्यासच त्याची अंमलबजावणी करू. आम्ही ऑफर करत असलेले नवीन अनुभव आणि माहितीच्या वापराविषयीच्या पद्धतींविषयी तुम्हाला अपडेट करत राहू.
या उद्देशांसाठी कोणाची WhatsApp माहिती Facebook Companies सोबत शेअर केली जाते?
सर्व WhatsApp वापरकर्त्यांनी आमच्या सेवा वापरण्याचा पर्याय निवडल्यास आम्ही सर्व WhatsApp वापरकर्त्यांसाठी माहिती शेअर करतो. यामध्ये Facebook वापरकर्ते नसलेल्या WhatsApp वापरकर्त्यांचा समावेश असू शकतो कारण Facebook Companies मधून मूल्यवान माहिती मिळवण्यासाठी आणि आमच्या गोपनीयता धोरणात व या लेखामध्ये वर्णन केलेल्या महत्त्वाच्या उद्दिष्ट्यांची पूर्तता करण्यासाठी आमच्याकडे आमच्या सर्व वापरकर्त्यांसाठी माहिती शेअर करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.
असे असले तरीही, आम्ही या उद्दिष्ट्यांची पूर्तता करण्यासाठी किमान माहिती शेअर करतो. आम्ही शेअर करत असलेली माहिती अपडेटेड असेल याचीदेखील आम्ही खात्री करतो. म्हणून तुम्ही तुमचा WhatsApp फोन नंबर अपडेट करण्याचे ठरवल्यास,Facebook फॅमिलीच्या ज्या सदस्यांना तो नंबर आमच्याकडून प्राप्त झाला आहे ते सदस्यदेखील तो नंबर अपडेट करू शकतील.
महत्त्वाचे म्हणजे, WhatsApp तुमचे WhatsApp संपर्क Facebook किंवा Facebook Companies च्या कोणत्याही इतर सदस्यांसोबत त्यांच्या स्वतःच्या उद्देशांसाठी शेअर करत नाहीत आणि असे काही करण्याची त्यांची योजनाही नाही.
माझ्याकडे Facebook Companies नी माझी WhatsApp माहिती वापरण्याविषयी कोणत्या निवडी आहेत?
तुम्ही आमच्या सेवा वापरणे कधीही थांबवू शकता आणि ॲपमधील माझे खाते हटवा फीचरद्वारे तुमचे खाते हटवू शकता. तुमचे Facebook खाते हटवल्यामुळे तुमच्या WhatsApp च्या वापरावर परिणाम होत नाही, त्याप्रमाणे WhatsApp खाते हटवल्याचा परिणाम इतर Facebook Companies द्वारे ऑफर केलेली ॲप्स आणि सेवा वापरण्यावर होणार नाही. तुम्ही तुमचे WhatsApp खाते हटवता तेव्हा काय होते याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी कृपया WhatsApp चे गोपनीयता धोरण पाहा.