इतर लोकांशी साध्या, सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने संवाद साधता यावा या उद्देशाने WhatsApp तयार करण्यात आले आहे. मेसेजिंग हे मुलभूतरीत्या खाजगी आहे आणि आमच्या सेवाशर्ती आमचा प्लॅटफॉर्म आणि आमचे वापरकर्ते सुरक्षित राहतील अशा पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत. WhatsApp जबाबदारीने कसे वापरावे हे समजून घेण्यासाठी अनेकांनी आमच्याकडे विचारणा केली आहे. आणि म्हणूनच वापरकर्त्यांना WhatsApp वापरताना उत्तम अनुभव यावा यासाठी आम्ही ही मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली आहेत. WhatsApp चे सर्व वापरकर्ते, जसे की सरकारी संस्था, राजकीय पक्ष आणि राजकीय नेते या सर्वांनीदेखील WhatsApp वापरताना खालील नियम पाळणे आवश्यक आहे. WhatsApp वर ऑटोमेटेड पद्धतीने येणारे आणि भरपूर प्रमाणात येणारे मेसेजेस म्हणजेच बल्क मेसेजिंग कसे प्रतिबंधित करावे याविषयी हा व्हाइट पेपर.
WhatsApp वापरताना या गोष्टी ध्यानात ठेवणे उत्तम
मेसेजिंग खाजगी ठेवा: वैयक्तिक चॅटसाठी आणि लहान ग्रुप्समधील चॅटसाठी वापरकर्त्यांनी त्यांचे खाते स्वतःच व्यवस्थापित करणे अपेक्षित आहे.
लोकांची परवानगी मागा: एखाद्या व्यक्तीने स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधला असेल किंवा तुम्ही WhatsApp द्वारे त्यांच्याशी संपर्क साधावा अशी विनंती त्यांनी स्वतःहून केली असेल, अशाच व्यक्तींना मेसेज पाठवावा. लोकांनी सर्वप्रथम तुम्हाला स्वत:हून मेसेज करावा यासाठी तुम्ही तुमचा फोन नंबर देणे उत्तम ठरेल. कोणी तुम्हाला त्यांचा फोन नंबर दिला असेल तर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना मेसेज करावा. जसे की, प्रथम तुम्ही कोण आहात आणि त्यांचा फोन नंबर तुम्हाला कसा मिळाला हे त्यांना सांगा.
लोकांच्या इच्छेचा आदर करा: एखाद्या वापरकर्त्याने तुम्ही त्यांना मेसेज पाठवू नये असे सांगितले असेल तर, त्यांना तुम्ही तुमच्या ॲड्रेस बुकमधून काढून टाकावे आणि त्यांना परत संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये. एखाद्या व्यक्तीला ग्रुपमध्ये सामील करण्यापूर्वी त्यांची परवानगी मिळवणे आवश्यक आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला ग्रुपमध्ये गटामध्ये सामील केले आणि ती व्यक्ती स्वतःहून त्या गटामधून बाहेर पडली, तर त्यांच्या निर्णयाचा आदर करा.
ग्रुप नियंत्रणे वापरा: आम्ही WhatsApp ग्रुप्ससाठी 'केवळ ॲडमीनच मेसेज पाठवू शकतील' हे सेटिंग विकसित केले आहे. तुम्ही ॲडमीन असाल तर, सर्व सहभागी की केवळ गट ॲडमीनच ग्रुपवर मेसेजेस पाठवू शकतात हे तुम्ही ठरवू शकता. हे फीचर वापरल्याने ग्रुप्समध्ये येणारे नकोसे मेसेजेस बंद होण्यास मदत होते.
फॉरवर्ड करण्यापूर्वी दोन वेळा विचार करा: प्रत्येक फॉरवर्ड होणाऱ्या मेसेजला आम्ही लेबल लावतो जेणेकरून, शेअर करताना लोक एकदा विचार करतील.
हे करू नका
नकोसे, ऑटोमेटेड आणि भरपूर मेसेजेस पाठवणे: WhatsApp वरून भरपूर मेसेजेस, ऑटोमेटेड मेसेजेस पाठवण्याचा आणि ऑटो-डायल करण्याचा प्रयत्न करू नका. WhatsApp हे मशीन लर्निंग टेक्नॉलॉजी आणि वापरकर्त्यांकडून येणारे रिपोर्ट्स या दोन्हीचा वापर करून नको असलेले मेसेज पाठवणारे खाते बॅन करू शकते. लोकांना आवडणार नाही अशा प्रकारे या वापरकर्त्यांशी पद्धतशीरपणे संपर्क साधणाऱ्यावरही अशा पद्धतीची कारवाई होते. शिवाय, अनधिकृत किंवा ऑटोमेटेड खाती किंवा ग्रुप्स तयार करू नका किंवा WhatsApp च्या अनधिकृत आवृत्त्या वापरू नका.
जी संपर्क यादी तुमची नाही ती वापरणे: परवानगी शिवाय कोणाचाही फोन नंबर शेअर करू नका किंवा बेकायदेशीर स्रोतांमधून येणार डेटा वापरून (जसे की फोन नंबर्स विकत घेणे) WhatsApp वापरकर्त्यांना मेसेज पाठवणे किंवा त्यांना ग्रुप्समध्ये सामील करणे, हे कधीही करू नका.
ब्रॉडकास्ट लिस्टचा अतिवापर करणे: वापरकर्त्यांनी तुमचा फोन नंबर त्यांच्या ॲड्रेस बुकमध्ये समाविष्ट केलेला असेल तरच त्यांना तुम्ही ब्रॉडकास्ट लिस्ट वापरून पाठवलेले मेसेजेस मिळतात. तुम्ही ब्रॉडकास्ट मेसेजचा वारंवार वापर केला तर, तुमच्या या मेसेजेसची तक्रार केली जाण्याची शक्यता असते. ज्या खात्यांची अनेकवेळा तक्रार नोंदवली गेली आहे अशी खाती आम्ही ब्लॉक करतो.
आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन करणे: आम्ही येथे याची आठवण करून देऊ इच्छितो की, चुकीची व बेकायदेशीर माहिती प्रकाशित करणे, धमकी देणारे, भीतीदायक, द्वेष व मत्सर असलेले आणि जातीय किंवा धार्मिक भावना दुखावणारे मेसेजेस पाठवणे हे आमच्या सेवाशर्तींनुसार निषिद्ध आहे. WhatsApp बरोबर तुमचे नाते सेवाशर्तींमध्ये नमूद केले आहे, आणि जर वरील मसुद्यामध्ये आणि सेवाशर्तींमध्ये काही तफावत आढळल्यास सेवाशर्तींमधील मजकूर ग्राह्य धरावा.