WhatsApp चा जबाबदारीने वापर कसा करावा
इतर लोकांना मेसेज पाठवण्यासाठी सोपा, सुरक्षित आणि विश्वासार्ह मार्ग म्हणून WhatsApp तयार करण्यात आले आहे. मेसेज करणे अर्थातच खाजगी आहे आणि आमच्या सेवाशर्ती या आमचा प्लॅटफॉर्म व वापरकर्ते यांना सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. WhatsApp चा जबाबदारीने वापर करण्याची खात्री करण्यासाठी WhatsApp च्या सर्व वापरकर्त्यांनी पुढील मार्गदर्शक तत्त्वांचे पुनरावलोकन करणे आवश्यक आहे.
सर्वोत्तम पद्धती
- ओळखीच्या संपर्कांशी संवाद साधा: ज्यांनी तुमच्याशी प्रथम संपर्क साधला आहे किंवा ज्यांनी तुम्हाला त्यांच्याशी WhatsApp वर संपर्क साधण्याची विनंती केली आहे, केवळ त्यांनाच मेसेजेस पाठवा. संपर्कांना तुमचा फोन नंबर देणे सर्वात उत्तम, जेणेकरून ते तुम्हाला स्वत:हून सर्वप्रथम मेसेज पाठवू शकतील.
- परवानगी घ्या आणि मर्यादांचा आदर करा: तुम्ही संपर्कांना ग्रुपमध्ये जोडण्यापूर्वी त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला ग्रुपमध्ये जोडल्यास आणि त्यांनी स्वतःला काढून टाकल्यास, त्यांच्या निर्णयाचा आदर करा.
- ग्रुप नियंत्रणे वापरणे: आम्ही WhatsApp ग्रुप्ससाठी फक्त ॲडमीन मेसेज पाठवू शकेल असे सेटिंग तयार केले आहे. तुम्ही ॲडमीन असल्यास, ग्रुपमधील सर्व सदस्य मेसेजेस पाठवू शकतात की फक्त ग्रुप ॲडमीन मेसेज पाठवू शकतात हे तुम्ही ठरवू शकता. हे फीचर वापरल्यामुळे ग्रुप्समधील नको असलेले मेसेजेस कमी करण्यात मदत होते. पुढील प्लॅटफॉर्म्सवर ग्रुप ॲडमीन सेटिंग्ज कशी बदलावीत ते जाणून घ्या: Android, iPhone, KaiOS किंवा वेब आणि डेस्कटॉप.
- मेसेजेस फॉरवर्ड करण्यापूर्वी दोनदा विचार करा: आम्ही सर्व फॉरवर्ड केलेल्या मेसेजेससाठी लेबल तयार केले आहे आणि मेसेजेस शेअर करण्याआधी वापरकर्त्यांना पुनर्विचार करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, तुम्ही मेसेजेस किती वेळा फॉरवर्ड करू शकता ते मर्यादित केले आहे. एखादी गोष्ट खरी आहे की नाही याची तुम्हाला खात्री नसल्यास किंवा मेसेज कोणी लिहिला आहे हे माहीत नसल्यास, आम्ही तो फॉरवर्ड करण्याची शिफारस करत नाही. चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
हे करू नका
खाली सूचीबद्ध केलेल्या कोणत्याही मार्गाने WhatsApp वापरल्याने तुमचे खाते बॅन केले जाऊ शकते.
- नको असलेले मेसेजेस: एखाद्या संपर्काने तुम्हाला मेसेज पाठवणे थांबवण्यास सांगितल्यास, तुम्ही तुमच्या अॅड्रेस बुकमधून तो संपर्क काढून टाकणे आणि त्यांच्याशी पुन्हा संपर्क न साधणे आवश्यक आहे.
- ऑटोमेटेड किंवा मोठ्या प्रमाणात पाठवलेले मेसेजेस: WhatsApp वापरून मोठ्या प्रमाणात मेसेजेस, ऑटो-मेसेजेस पाठवू नका किंवा ऑटो-डायल करू नका. नको असलेले ऑटोमेटेड मेसेजेस पाठवणारी खाती शोधण्यासाठी आणि ती बॅन करण्यासाठी, WhatsApp मशीन लर्निंग तंत्रज्ञान आणि वापरकर्त्यांकडून मिळवलेले रिपोर्ट्स या दोन्ही गोष्टी वापरते. तसेच, अनधिकृत किंवा ऑटोमेटेड मार्गांनी खाती अथवा ग्रुप्स तयार करू नका किंवा WhatsApp च्या फेरबदल केलेल्या आवृत्त्या वापरू नका. WhatsApp हे ऑटोमेटेड आणि मोठ्या प्रमाणात मेसेजेस पाठवण्याचा गैरवापर कसा प्रतिबंधित करते याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी, तुम्ही हे वाचू शकता व्हाइट पेपर.
- तुमच्या नाहीत अशा संपर्क सूची वापरणे: संमतीशिवाय फोन नंबर्स शेअर करू नका किंवा बेकायदेशीर स्रोतांकडून मिळवलेला डेटा वापरकर्त्यांना WhatsApp वर मेसेज पाठवण्यासाठी अथवा त्यांना ग्रुप्समध्ये जोडण्यासाठी वापरू नका.
- ब्रॉडकास्ट सूचीचा अतिवापर करणे: वापरकर्त्यांनी तुमचा फोन नंबर त्यांच्या संपर्क सूचीमध्ये जोडला असेल, तरच तुम्ही ब्रॉडकास्ट सूची वापरून पाठवलेले मेसेजेस त्यांना प्राप्त होतील. कृपया लक्षात ठेवा, ब्रॉडकास्ट मेसेजेसचा वारंवार वापर केल्यामुळे लोक तुमच्या मेसेजेसची तक्रार नोंदवू शकतात. अनेक वेळा तक्रार नोंदवण्यात आलेली खाती आम्ही बॅन करतो.
- वैयक्तिक माहिती काढून घेणे: परवानगी नसलेल्या कोणत्याही उद्देशासाठी ऑटोमेटेड किंवा मॅन्युअल टूल वापरून WhatsApp वरून मोठ्या प्रमाणावर माहिती काढून घेणे टाळा. अशा प्रकारे वापरकर्त्यांकडून फोन नंबर, वापरकर्त्यांचे प्रोफाइल फोटो आणि WhatsApp वरील स्टेटस यासारखी इतर माहिती काढून घेतल्यास आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन होते.
- आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन करणे: कृपया नोंद घ्या, की आमच्या सेवाशर्ती खोट्या गोष्टी प्रकाशित करणे आणि बेकायदेशीर, धमकावणारे, भीती घालणारे, द्वेषपूर्ण व वांशिक किंवा मानववंशीय संदर्भातून आक्षेपार्ह असलेले वर्तन करणे यांसह इतर अनेक गोष्टी प्रतिबंधित करतात. तुम्ही आमच्या सेवाशर्तींचे येथे पुनरावलोकन करू शकता.