प्रत्येक WhatsApp मेसेजला तुमच्या डिव्हाइसमधून निघण्याआधी सिग्नल एन्क्रिप्शन प्रोटोकॉलने सुरक्षित केले जाते. तुम्ही एखाद्या WhatsApp Business खात्यास मेसेज करता तेव्हा तुमचा मेसेज त्या बिझनेसने निवडलेल्या ठिकाणी सुरक्षितरीत्या पोहोचवला जातो.
WhatsApp यासाठी WhatsApp Business ॲप वापरणाऱ्या किंवा मेसेजेस व्यवस्थापित करण्यासाठी व स्टोअर करण्यासाठी एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची मदत घेणाऱ्या बिझनेससोबतची चॅट्स विचारात घेते. बिझनेसला मेसेज मिळाल्यावर त्या मेसेजला त्या बिझनेसची स्वतःची गोपनीयता धोरणे लागू होतात. तो बिझनेस या मेसेजेसवर प्रक्रिया करण्यासाठी आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी काही कर्मचाऱ्यांना किंवा व्हेंडर्सना नियुक्त करू शकतो.
काही बिझनेस1 ग्राहकांचे मेसेजेस स्टोअर करण्यासाठी आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी WhatsApp ची पालक कंपनी असलेल्या Facebook ची निवड करू शकतात. तुम्हाला कोणत्या जाहिराती दिसाव्यात हे ठरवण्यासाठी Facebook तुमचे मेसेजेस ऑटोमॅटिकली वापरणार नाही, मात्र बिझनेसला त्यांना प्राप्त झालेले मेसेजेस/चॅट्स त्यांच्या मार्केटिंग व जाहिरातीसाठी वापरता येतील व त्यामध्ये Facebook वरील जाहिरातीचाही समावेश असू शकतो. एखाद्या बिझनेसची गोपनीयता धोरणे काय आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही त्या बिझनेसशी संपर्क साधू शकता.
टीप: जर एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्ट केलेल्या एखाद्या चॅटचे एन्क्रिप्शन स्टेटस बदलले तर तो बदल नेहमीच वापरकर्त्याला दिसतो. कोणती चॅट्स एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केली जातात याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी कृपया आमचा व्हाइट पेपर पहा.
WhatsApp वरील 'पेमेंट्स' हे फीचर काही निवडक देशांमध्येच उपलब्ध आहे आणि ते एका बॅंक खात्यामधून दुसऱ्या बॅंक खात्यात WhatsApp ने पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देते. कार्डचा नंबर आणि बॅंकेशी संबंधित नंबर्स हे एन्क्रिप्ट केलेल्या आणि उच्च सुरक्षा लाभलेल्या नेटवर्कवर स्टोअर केलेले असतात. मात्र, बॅंकांना पेमेंट्सशी संबंधित व्यवहारावर प्रक्रिया करण्यासाठी पेमेंट्सशी संबंधित माहिती लागते. त्यामुळे, ही पेमेंट्स एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेली नसतात.
तुमच्या मेसेजचे काय होते हे तुम्हाला कळावे याची दक्षता WhatsApp घेते. एखाद्या व्यक्तीने किंवा बिझनेसने तुम्हाला मेसेज करू नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांना थेट चॅटमधूनच ब्लॉक करू शकता किंवा तुमच्या संपर्क यादीतून हटवू शकता. तुमचे मेसेजेस कसे हाताळले जातात हे तुम्हाला समजावे आणि तुम्हाला माहितीवर आधारित योग्य निर्णय घेता यावा याची आम्ही खबरदारी घेतो.
1२०२१ मध्ये