तुम्ही WhatsApp ला कनेक्ट करू शकत नसाल याचे मुख्य कारण हे असू शकते की तुमचा फोन तात्पुरत्या काळासाठी इंटरनेटशी जोडला गेला नसेल.
तुमची चांगल्या इंटरनेट कनेक्शन वर आहात का याची खात्री करून घेण्यासाठी खालील पायऱ्यांचा अवलंब करा :
तुम्ही जर तुमच्या फोनच्या डेटा नेटवर्क वरून कनेक्ट होऊ शकत नसलात तर एक किंवा अधिक वाय-फाय नेटवर्क वर कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर एखादे वेबपेज चालू करू शकत असलात तसेच एखादे इंटरनेटवर चालणारे ॲप्लिकेशन तुमच्या फोनचे इंटरनेट वापरून चालू होत असेल आणि फक्त WhatsApp कनेक्ट होत नसेल तर अशा कनेक्शनविषयीच्या समस्यांबद्दल अधिक जाणून घ्या येथे : Android | iPhone
जर तुमच्या फोनवर इतर ॲप्लिकेशन तुमचा डेटा प्लॅन वापरून चालत असतील पण WhatsApp चालत नसेल तर हे कदाचित तुमच्या मोबाइल प्रदात्याने तुमचे वायरलेस ऍक्सेस पॉईंट्स काही ॲप्लिकेशन्स साठी ब्लॉक केल्याने होत असेल. WhatsApp अजूनही तुमच्या फक्त डेटा वर चालत नसेल तर खालील उपाय करून बघा :