तुम्ही तुमच्या फोनच्या ॲप्लिकेशन स्टोअरमधून WhatsApp सहजरीत्या अपडेट करू शकता. तुम्हाला आलेल्या एखाद्या मेसेजला तुमच्या WhatsApp च्या सध्याच्या आवृत्तीवर सपोर्ट नसेल, तर तुम्हाला WhatsApp अपडेट करण्याची गरज आहे हे लक्षात घ्या. आम्ही तुम्हाला नेहमीच WhatsApp ची नवीनतम आवृत्ती वापरण्याची शिफारस करतो. नवीन आवृत्तीमध्ये नवीन फीचर्स आणि मागच्या आवृत्तीमधील बग्समध्ये केलेल्या सुधारणा असतात.
Google प्ले स्टोअर वर जा आणि WhatsApp शोधा. WhatsApp Messenger च्या बाजूला असलेल्या अपडेट करा वर टॅप करा.
App Store वर जा आणि WhatsApp शोधा. WhatsApp Messenger च्या बाजूला असलेल्या UPDATE वर टॅप करा.
JioStore वर किंवा ॲप्स मेनूमधील Store वर प्रेस करा. बाजूला स्क्रोल करा आणि सोशल निवडा, त्यानंतर WhatsApp निवडा. ओके किंवा निवडा > अपडेट करा वर प्रेस करा.