WhatsApp वेब, WhatsApp डेस्कटॉप किंवा Portal वर WhatsApp मध्ये लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनने एक क्यु आर कोड स्कॅन करावा लागेल.
ते करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या फोनवर WhatsApp उघडा. तुमच्याकडे:
Android असल्यास : चॅट्स टॅब > अधिक पर्याय > WhatsApp वेब येथे जा.
iPhone असल्यास : सेटिंग्ज > WhatsApp वेब/डेस्कटॉप येथे जा.
तुमच्या कॉंप्युटरवर किंवा Portal वर दिसणारा क्यु आर कोड तुमच्या फोनने स्कॅन करा. क्यु आर कोड स्कॅन करतेवेळी तुम्ही इतर कोणत्या डिव्हाइसवर लॉग इन असाल, तर:
Android असल्यास : क्यु आर कोड स्कॅन करा वर टॅप करा
iPhone असल्यास : क्यु आर कोड स्कॅन करा वर टॅप करा
त्यानंतर सूचना दिसल्यास, पूर्ण झाले वर टॅप करा.
टीप : तुम्ही WhatsApp वेब, WhatsApp डेस्कटॉप आणि Portal वर एकावेळी एकाच सेशनमध्ये लॉग इन असू शकता.
लॉग आउट करणे
तुम्ही WhatsApp वेब किंवा डेस्कटॉप वरील WhatsApp मधून लॉग आउट करू शकता.
WhatsApp वेब किंवा WhatsApp डेस्कटॉप उघडा.
मेनू वर किंवा तुमच्या चॅट्सच्या यादीवर दिसत असलेल्या > लॉग आउट करा वर क्लिक करा.
Portal वरून WhatsApp खाते काढून टाकण्यासाठी, कृपया हा लेख वाचा.
Android वरून लॉग आउट करणे
तुम्ही Android वर WhatsApp वेब, WhatsApp डेस्कटॉप किंवा Portal वरून लॉग आउट करू शकता.
WhatsApp उघडा.
चॅट्स टॅब > अधिक पर्याय > WhatsApp वेब वर क्लिक करा.
यादीमध्ये असलेल्या कॉंप्युटरवर किंवा Portal वर जा > लॉग आउट करा वर टॅप करा.
सर्व डिव्हाइसेसवरून लॉग आउट करणे
WhatsApp वेब, WhatsApp डेस्कटॉप किंवा पोर्टल अशा सर्व डिव्हाइसेसवरून एकाचवेळी लॉग आउट करण्यासाठी तुम्ही तुमचा फोन वापरू शकता.
Android : WhatsApp उघडा, त्यानंतर चॅट्स टॅब > अधिक पर्याय > WhatsApp वेब > सर्व डिव्हाइसेसवरून लॉग आउट करा > लॉग आउट करा वर टॅप करा.
iPhone : WhatsApp उघडा, त्यानंतर सेटिंग्ज > WhatsApp वेब/डेस्कटॉप > सर्व डिव्हाइसेसवरून लॉग आउट करा > लॉग आउट करा वर टॅप करा.