WhatsApp Messenger वरून WhatsApp Business वर जाण्याविषयी
WhatsApp Business ॲप हे लघु उद्योजकांसाठी असलेले निःशुल्क डाउनलोड करता येणारे ॲप आहे. बिझनेस प्रोफाइल आणि ऑटोमेटेड मेसेजिंग यासारख्या व्यवसाय-केंद्रित वैशिष्ट्यांमुळे ग्राहकांशी संपर्कात राहणे आणि आपल्या बिझनेसची जाहिरात करणे सुलभ होते. तसेच, ते दिसायला आणि वापरायला अगदी WhatsApp Messenger सारखेच आहे.
जे बिझनेस सध्या WhatsApp Messenger वापरत आहेत त्यांना WhatsApp Business वर जाण्यासाठी केवळ काही पायऱ्यांचा अवलंब करावा लागेल. WhatsApp Business मध्ये तुमच्या फोन नंबरची पडताळणी झाल्यानंतर, तुम्ही तुमचा सर्व मीडिया (जसे की, आवडते स्टिकर्स, वॉलपेपर), चॅट प्राधान्ये (जसे की, म्यूट चॅट, चॅट रिंगटोन), आणि चॅट इतिहास हा WhatsApp Messenger वरून विनासायास WhatsApp Business वर हलविला जातो.
टीप: WhatsApp Business मधून तुमची सर्व माहिती परत WhatsApp Messenger वर हलवणे सध्या शक्य नाही. तुम्ही पुन्हा WhatsApp Messenger वर स्विच करणे निवडल्यास, WhatsApp Business वापरताना तुम्ही केलेली चॅट्स आणि मीडिया फाइल्स यांसह बिझनेस फीचर्सदेखील गमवाल.
संबंधित लेख:
- WhatsApp Messenger हे WhatsApp Business वर कसे हलवायचे: Android | iPhone
- WhatsApp Business ॲप विषयी