तुमचे मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीय तुमचा WhatsApp क्यु आर कोड स्कॅन करून तुम्हाला त्यांच्या संपर्क यादीत जोडू शकतात. तुम्ही तुमचे WhatsApp खाते रिसेट करत नाही किंवा हटवत नाही, तोपर्यंत तुमचा क्यु आर कोड एक्स्पायर होणार नाही.
तुमचा WhatsApp क्यु आर कोड फक्त तुमच्या विश्वासातल्या व्यक्तींसोबतच शेअर करा. कारण, तुम्ही ज्या व्यक्तीसोबत WhatsApp क्यु आर कोड शेअर केला आहे, ती व्यक्ती तो कोड दुसऱ्या व्यक्तीला फॉरवर्ड करू शकते आणि ती दुसरी व्यक्ती तुमचा कोड स्कॅन करून तुम्हाला संपर्क यादीत जोडू शकते.